तीन महिने घरभाडे वसुली न करण्याच्या सूचना – अपर मुख्य सचिव संजय कुमार ;

मुंबई – कोरोना या साथीच्या रोगाच्या पार्श्वभुमीवर येत्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन सुरुं राहणार आहे. या परिस्थितीत सर्व व्यापार,व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने रोजगारावर परिणाम झाला …

कोरोना पाश्वभूमीवर आर्थिक संकट थोपवण्यासाठी डॉ.आंबेडकरांच्या अर्थनितीचा अभ्यास करा – मुकेश शिंदे

नवी मुंबई – कोरोनाच्या पाश्वभूमीवर देशभर लॉक डाऊन सुरु असून अनेक उघोग धंदे व्यवसाय बंद आहेत बेरोजगारी वाढवण्याची शक्यता निर्माण झाली असून खाजगी क्षेत्रात काम …

भाजीपाला शेतातून थेट सोसायटीच्या गेटवर उपलब्ध करून देणारा नवी मुंबई महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम

नवी मुंबई:   ‘कोव्हीड 19’ या घातक संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊनचा कालावधी 03 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत सर्वांनी घरातच थांबणे अत्यावश्यक आहे.  मात्र जीवनावश्यक व दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी नागरिक बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. ही गर्दी कमी करण्याकरिता महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सहज उपलब्ध …

कोरोना विषयक महापौरांनी सूचविलेल्या विविध उपाययोजनांना पालकमंत्र्यांची संमती

नवी मुंबई:     कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना करीत असून महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी …

वाशी एपीएमसीतील धान्य मार्केटच्या व्यापाऱ्याला कोरोनाची लागण.

नवी मुंबई (प्रतिनिधी ) वाशी तुर्भे येथील मुंबई एपीएमसीतील धान्य मार्केटमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण  झाली आहे. व्यापाऱ्यााला कोरोना झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तसेच …

अल्फलाह इंग्लिश कॉन्व्हेंट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी ;

कोरोनामुळे लोक लॉकडाउनची परिस्थितीत फक्त तीघांच्या उपस्थितीत दिनांक १४ एप्रिल सकाळी दहा वाजता अल्फलाह इंग्लिश कॉन्व्हेंट मोताळा कार्यालयात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी …

भुसावळात न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदा व्हि.सी.द्वारे जामिनावर सुनावणी ; पहिल्याच दिवशी मारूळ हाणामारी प्रकरणातील दोघा संशयीत आरोपींना मिळाला जामीन ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू असून न्यायालयात देखील महत्वपूर्ण खटल्यांवरच कामकाज सुरू करण्यात आले आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अति महत्वाच्या खटल्यांमध्ये व्हिडिओ …

यादीत नाव समाविष्ट करण्याची ऑनलाइन कामे त्वरित करा ; शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना धान्य द्यावे- प्रा.धिरज पाटील ;

भुसावळ (प्रतिनिधी )- अन्न सुरक्षा यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांनी अर्ज सादर केले असून ऑनलाइन प्रणाली मार्फत लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात यासाठी शुक्रवार १७ एप्रिल …

श्रावण बाळ योजनेतील ज्येष्ठ लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्याचे वेतन त्वरीत द्यावे: – दीपक धांडे यांची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )- श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्याना फेब्रुवारी व मार्च महिन्याचे दोन महिन्याचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे अशी मागणी नगरसेवक दीपक धांडे यांनी १७ …

भुसावळ शहरासह तालुक्यातील नागरिकांना रेशन धांन्य मिळत नसल्याच्या तक्रारित वाढ ; विनाकारण फॉर्म भरण्याबाबत नागरिकांना त्रास ; तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष ; प्रशासकीय नियमांचे व अटींचे पालन करून शिवसैनिकांकडे रेशनबाबतीच्या तक्रारी कराव्या ; शिवसेना तालुका प्रमुख -समाधान महाजन यांचे आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील रेशन धान्य वाटपासंदर्भात तालुक्यातील व भुसावळ शहरातील बरेच रेशनिंग कार्ड धारक भुसावळ तहसील मध्ये येऊन प्रशासनाकडे धान्य मिळत नसल्याबाबत या …

एस.टी.कर्मचाऱ्यांचा कोरोना ग्रस्तांसाठी मदतीचा हात.

भुसावळ (प्रतिनिधी )- एस.टी.महामंडळ भुसावळ आगारातील कर्मचाऱ्यांनी कोरोना ग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला असून भुसावळ आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी डेपोतील श्री.गुरुदत्त मंदिर सेवा समिती तर्फे कोरोना बाधितांना …

कल्याण-चांगसारी दरम्‍यान पार्सल रेल्‍वे चालणार!

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेतर्फे कल्याण व चांगसारी दरम्यान वैद्यकीय, भोजन आदी अत्‍यावश्यक वस्तू पाठविण्यासाठी दि.१७ एप्रिल रोजी पार्सल रेल्‍वे चालवणार आहे .  जर संपूर्ण …

पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न करणारे सहा दारोडेखोर यावल पोलिसांच्या ताब्यात

यावल(प्रतिनिधी ) यावल पासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या यावल भुसावळ रोडवर पाटाच्या चारी ते पेट्रोल पंप दरम्यान दरोडा टाकून लुटण्याच्या उद्देशाने तयारी करून हातात …

स्वस्त धान्य दुकानांच्या वेळा निश्चित ; नागरीकांनी धान्य घेतांना गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे ; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल;

जळगाव दि. 16 – अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाथार्थ्याना तसेच एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांसाठी कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत शासनाने आधी घोषित …

जळगावला कोरोनाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा मंजूर – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीला यश ;

जळगाव (प्रतिनिधी ); जळगाव येथे कोरोनाची चाचणी करणारी लॅब उपलब्ध करण्यात यावी या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. शासकीय वैद्यकीय …

नियम मोडल्याचे दररोज किमान १५ गुन्हे नोंदवा – प्रांत रामसिंग सुलाणे;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरात अनेक ठिकाणी नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत. काही दुकानदार मास्क न लावता, सोशल डिस्टन्सिंग न पाळता साहित्य विकत आहेत. त्यामुळे नगरपरिषदेच्‍या …

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्यांचा कर्मवीर पुरस्कार देऊन होणार ई सन्मान

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना विषाणूंच्या संक्रमणापासून स्वतःचा जीव धोक्यात घालून तहान,भुक विसरून अहोरात्र परिश्रम करून आपणा सर्वांना वाचविणाऱ्या, कोरोना विषाणूचा समूळ नायनाट व्हावा म्हणून सेवा …

रेल्वेतर्फे मालवाहतूक नियमांमध्ये बदल ;

भुसावळ (प्रतिनिधी )↑ रेल्वेतर्फे मालवाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. बदल या प्रमाणे असून यामध्ये 1) लोड करण्यासाठी दोन स्टेशन वरुन माल बुक करताना अंतर …

भाजपचे माजी खा. हरीभाऊ जावळे यांना धमकी देणाऱ्या विरुद्ध त्वरित कारवाई करावी-भुसावळ भाजपच्याबतीने निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )- जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा माजी खासदार वआमदार हरिभाऊ जावळे यांना जिवे ठार मारण्याच्या धमकीची सखोल चौकशी व्हावी व त्या …

जळगाव जिल्हा आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळातर्फे भुसावळात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

भुसावल (प्रतिनिधि )- जळगाव जिल्हा आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ भुसावळ शाखेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाजातील गरजू कुटुंबाना लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक किराणा वाटप करून …

भुसावळातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये महामानवास जयंतीनिमित्त अन्नदान करून अभिवादन ;बारसे दाम्पत्याचा उपक्रम :

भुसावळ (प्रतिनिधी )- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे व नगरसेविका सोनी संतोष बारसे तसेच माजी नगरसेविका कौशल्या बारसे …