फ्रान्स अध्यक्षांच्या कृतीचा भुसावळातील मुस्लीम बांधवांनी केला निषेध ; तहसिलदारांना निवेदन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
जगाला शांतीचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांची विटंबना करणारे कार्टून फ्रान्सच्या चौकात लावण्यात आल्याने या कृतीचा भुसावळातील मुस्लीम समाजबांधवांनी शुक्रवार ३० रोजी निषेध केला आहे.
फ्रान्स अध्यक्षांच्या निर्णयामुळे जगभरातील मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याचे तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले असून
निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे .
भारताने फ्रान्सशी आर्थिक संबंध तोडावेत तसेच फ्रान्स अध्यक्ष व तेथील नागरीकांना भारतात येण्यास मनाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, निवेदन देण्यापूर्वी फ्रान्स राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांच्या प्रतिमेला जोडेही मारण्यात आले.
निवेदन देताना मुस्लिम समाजाचे मौलाना अब्दुल हकीम, मौ.गुलाम जिलानी, माजी नगरसेवक साबीर भाई, काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो.मुनव्वर खान, जुनेद खान, अकबर गवली, जॉनी गवली, रेहान कुरैशी, जुबेर खान, नजीर कुरैशी, नजीर भाई, युनूस मामा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *