निकीता तोमरच्या हत्येप्रकरणी आरोपीस त्वरीत फाशी द्यावी -भुसावळात सकल हिंदू समाजातर्फे प्रांताना निवेदन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
धर्मांतरण करण्यास नकार दिला म्हणून भर रस्त्यावर गोळी घालून हत्या करणाऱ्यां आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी येथील सकल हिंदू समाजातर्फे करण्यात येवून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
२६ आॅक्टोबर रोजी फरीदाबाद (हरियाणा) येथे धर्मांतरण करण्यास नकार दिला म्हणून तौसीफ नामक जिहादी आरोपीने निकीता तोमर या भगिनीची भर रस्त्यावर गोळी घालून हत्या केली. त्यामुळे जिहादी आरोपी तौसीफ यास तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शुक्रवार ३० रोजी येथील सकल हिंदू समाजातर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भूषण महाजन , रोहीत महाले, मनोज चौधरी, प्रणव डोलारे प्रणय भागवत, भूषण दोडे, मयुर सावकारे, अविनाश सोनवणे, पंकज भारंबे यांचेसह हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *