शहरातील वाईट अप्रवृत्तिना वेळीच आळा घाला- भुसावळ शिवसेनेतर्फे प्रांतांना निवेदन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयासह डॉक्टर्स यांच्यावर होणारे हल्ले व त्रास देणाऱ्या अपप्रवृत्तीवर वेळीच आळा घालून योग्य कारवाई करावीं अशी मागणी येथील शिवसेनेचे शहराध्यक्ष बबलु ब-हाटे व शिवसैनिकानी आज प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनात नमूद केले आहे की , भुसावळ शहरात काही चुकीच्या वर्तवनुक करणाऱ्या प्रवृत्ती वाढत आहे. लहान बालिका तरुण मुली, महिला यांना बाहेर पड़णे अत्यंत अवघड व दयनीय झाले आहे , एवढेच नव्हे तर सामान्य जनतेसह वैद्यकीय क्षेत्रसुद्धा यातून सुटले नाही. लॉकडाउन काळापासून शहरातील खाजगी रुग्णालये अहोरात्र रुग्णसेवा करत आहेत. पण काही वाईट प्रवृत्ती असलेले समाजकंटक शहरातील डॉक्टरांना त्रास देणे, रुग्णालयाची तोडफोड करणे, डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे समोर येत आहे. भुसावळ शहरासह परिसरात सुद्धा रुग्णालयाची तोडफोड करण्याचे प्रकार घडत आहेत.असेच सुरु राहिले तर
महिला व मुलींना घराबाहेर पडणे कठीण होईल, डॉक्टरांना रुग्णालय चालविण्यात खुप अडचणी येतील त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होइल. याकरीता शहराच्या हितासाठी अश्या प्रवृत्तीला शासनाने त्वरित लगाम लावावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने भुसावळचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. महिला, मुलींची, आरोग्य सेविका, डॉक्टर यांचा समाजात आदर केला जातो आपण सर्वांनी समाजभान ठेवले पाहिजे असेही निवेदनात बबलू बऱ्हाटे, धिरज पाटील, सुरज पाटील, पवन नाले, धनराज ठाकूर यांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *