मध्य रेल्वे पुणे विभागात डीसीएन कामासाठी काही गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन व ओरिजिनेशन


भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे यार्ड तसेच पुणे–दौंड विभागातील विद्यमान लेआउटमध्ये बदल करण्यासाठी डीसीएन कामाकरिता विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही गाड्यांच्या वाहतुकीवर पुढीलप्रमाणे परिणाम होणार आहे:

गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन
गाडी क्रमांक 12136 नागपूर–पुणे एक्स्प्रेस  दिनांक 10.10.2026 रोजी नागपूर येथून सुटणारी गाडी हडपसर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.

गाडी क्रमांक 11406 अमरावती–पुणे  दिनांक 10.10.2026 रोजी अमरावती येथून सुटणारी गाडी हडपसर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.

गाडी क्रमांक 11078 जम्मूतवी–पुणे एक्स्प्रेस दिनांक 09.10.2026 रोजी जम्मूतवी येथून  सुटणारी गाडी हडपसर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.

गाडीचे ओरिजिनेशन
गाडी क्रमांक 12135 पुणे–नागपूर एक्स्प्रेस दिनांक 11.10.2026 रोजी पुणे स्थानकाऐवजी हडपसर स्थानकावरून 17:45 वाजता सुटेल.

रेल्वेच्या पायाभूत सुविधांची देखभाल तसेच प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.