शिरपूर कन्हाळा येथे तालुका पोलिसांची हातभट्टी अड्ड्यावर कारवाई ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ तालुक्यात शिरपूर कन्हाळा शिवारात तालुका पोलिसांनी गावठी हातभट्टीवर धाड टाकून सुमारे
३८हजार रूपयांचा मुद्देमाल नष्ट केला .
शिरपूर कन्हाळा शिवारात नाल्याचे जवळ सार्वजनिक जागी इसम जुम्मा छट्टू गवळी रा.कन्हाळा हा गावठी हातभट्टीची दारू गाळण्याचे गूळ मोह नवसागर मिश्रित द्रव्य कच्चे रसायन ६ ड्रम त्यात ११०० लिटर रसायण व गावठी हातभट्टीची २५ लिटर तयार दारू असे ड्रम सह अंदाजे किंमत ३८२५० /- रु चे मालासह मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध दिनांक २९ ऑक्टोबर रोजी ७.१० वाजेच्या सुमारास
प्रोव्ही कायदा अन्वये कलम 65 फ, ब, क, ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोहेकाँ विठ्ठल फुसे, गणेश राठोड, विनोद पाटील, रियाज काझी, होमगार्ड जगदीश पाटील, पंकज सपकाळे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *