भुसावळ डीआरएम कार्यलयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती तसेच राष्ट्रीय एकता दिवस येथील विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयाच्या प्रांगण मध्ये दिनांक 31ऑक्टोबर रोजीसाजरा करण्यात आला . प्रसंगी विभागीय रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दीली .
या समारोह सोहळयास विभागीय रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता ,अप्पर मंडल रेल्वे प्रबंधक मनोज कुमार सिन्हा विशेष अतिथि म्हणून उपस्थित होते .मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते .समारोहाचे सूत्र संचालन वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन डी गांगुर्डे यांनी केले .
राष्ट्रीय एकता दिवस निमित्ताने एकता ,अखंडता आणि सुरक्षाची भावना मजबूत प्रदान करण्यासाठी आरपीएफ सुरक्षा बल द्वारा दिनांक 31ऑक्टोबर 2020 ला मार्च पास्टचे आयोजन रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड वर करण्यात आले .ज्यामधे सर्व अधिकारी ,कर्मचारी आरपीएफ दल ,भारत स्काउट तथा गाइड सदस्य सहभागी होते .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर पी एफ सुरक्षा बल ला तीन हजार रुपये पुरस्कार घोषित करण्यात आला तसेच कल्याण विभागाला दोन हजार रुपये पुरस्कार घोषित करण्यात आला
या समारोहला यशस्वी करण्यासाठी मंडळ दूरसंचार विभाग ,इंजीनियरिंग विभाग तथा यांत्रिक विभाग ,कल्याण विभाग यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *