दिल्लीच्या महिला पत्रकाराचा विनयभंग : भुसावळ रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल ; आरोपीला अटक ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
पतीसोबत मंगला एक्स्प्रेसने निजामुद्दीन येथून कल्याणला जाणार्‍या दिल्लीतील महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची घटना गुरूवारी पहाटे घडली. महिला पत्रकाराने भुसावळ जंक्शनवर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी धारणी येथील संशयीताच्या मुसक्या आवळल्या.
अप ०२६१८ मंगला एक्स्प्रेसच्या कोच ए-१ मधून २७ वर्षीय महिला पत्रकार त्यांच्या पतीसोबत निजामुद्दीन येथून कल्याणला जात होत्या. खंडवा ते भुसावळ दरम्यान त्या गाडीतील प्रसाधनगृहात गेल्या. त्याचवेळी संशयीत शेख आबीद हारून खान २७, रा.धारणी, जि. अमरावती याने प्रसाधनगृहाचे दार वाजवून जबरदस्तीने आत शिरण्याचा प्रयत्न केला तसेच महिला पत्रकाराचा विनयभंग केला. पहाटे १.३० वाजता गाडी भुसावळ जंक्शनवर आल्यानंतर महिला पत्रकाराने लोहमार्ग पोलिसांशी साधून घटनेची माहिती दिली. उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, मधुकर पारधी, पांडुरंग बसू, नरेंद्र लोंढे यांनी ही कारवाई केली. संशयिताला खंडवा लोहमार्ग पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *