डेंग्यू प्रतिबंधासाठी भुसावळातील प्रभाग 18 मध्ये धुरळणी –
भुसावळ (प्रतिनिधी )-
जामनेर रोडवरील प्रभाग १८ मध्ये डेंग्यू रुग्णात झालेली वाढ पाहता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी प्रशासनाकडून पाठपुरावा केल्यानंतर या भागात धुरळणी करण्यात आली. या धुरळणमुळे डास व मच्छरांचा उपद्रव कमी होण्यास मोठी मदत होणार आहे शिवाय डेंग्यू आजारांलाही प्रतिबंध लागणार आहे. या परीसरातील गंगाराम प्लॉट, कोलते गल्ली, गौतम नगर, भवानी पेठ आदी भागात स्वतः धांडे यांनी उपस्थित राहत धुरळणी करून घेतली. त्यांच्या या उपक्रमाने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.



