वरणगावात आज आरोग्य निदान शिबिर ;

वरणगाव( प्रतिनिधी )- मंगळवार सकाळी दहा वाजता लहान मुले महिला यांचे आरोग्य शिबिर तसेच मूळव्याध व व्यसनमुक्ती यावर सल्ला देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली …

भुसावळातील पोलिसांच्या सतर्कतेने वयोवृद्धास मिळाली दुचाकी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-आठवडे बाजारात कामानिमित्त आलेल्या वयोवृद्धाची दुचाकी सापडत नसल्याने त्यांना दुचाकी चोरी झाल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत निरीक्षक दिलीप भागवत यांना …

नागरीकांच्या समस्या जाणून, सोडवण्याचा प्रयत्न करा – आंदोलने सुरूच ठेवावी- विलास पारकर

भुसावळ (प्रतिनिधी )-नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची भुसावळ विधानसभा क्षेत्रात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेतील सत्ताधारी सोडवणूक करू शकले नाही, शिवसेनेकडे जनता आशेने पहात आहे. गल्ली गल्लीतील …

जून्या वाहन खरेदीत आरटीओच्या त्रासाविरोधात आंदोलन करणार – भारतीय वाहन विक्री संघटनेचे नीलेश अजमेरांची माहिती

भुसावळ (प्रतिनिधी )- जुन्या वाहनांच्या खरेदी विक्री व्यवहारांमध्ये आरटीओ विभागाचा त्रास वाढला आहे. या त्रासाच्या विरोधात लवकरच मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. यासोबतच जून्या …

भुसावळात तरुणाचा खून : चौघे आरोपी जाळ्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील पंचशील नगर भागात जुन्या वादाच्या कारणावरून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या डोक्यात रॉड टाकून खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री १० वाजता घडली …

कोवीड रुग्णांची सेवा करतेय भुसावळची कन्या ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पुणे येथील भारती विदयापीठ वैक्यकिय महाविद्यालयामधील कोवीड हॉस्पीटल मध्ये सहामहिन्यांपासून भुसावळ येथील कन्या डॉ. यामिनी संजय इंगळे हि कोरोना बाधीत (पॅझिटीव्ह )रुग्णांवर उपचारकरुन …

इंजिनिअरिंग प्रवेश पात्रता निकषात बदल; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार ; भुसावळ ( प्रतिनीधी )- सून इंजिनीअरिंग (अभियांत्रिकी) प्रवेश घेतांना विद्यार्थ्यांना बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणित …

उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती झाल्याने दोघं अधिकाऱ्यांचा शिक्षकांकडून गौरव ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी पदी शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार व शिक्षण विस्तार अधिकारी तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद …

जबरी चोरीतील पसार आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-चाकूच्या धाकावर लूट केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात दाखल गुन्ह्यातील पसार आरोपीस ११ महिन्यानंतर पकडण्यात गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. लुकमान उर्फ लुक्का …

शिवसेना संपर्क प्रमुख विलास पारकर यांचा उद्यापासून दौरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन झाल्यानंतर याच धर्तीवर जळगांव जिल्ह्यातही महाविकास आघाडीचे सूत्र पक्के करण्यासंदर्भात हालचाली शिवसेनेत गतिमान झाल्या असून याच पार्श्वभूमीवर …

टपाल कार्यालयांची सेवा सुविधापूर्ण व लाभदायी;अधीक्षक पी. बी. सेलूकर : जागतिक टपाल दिनानिमित्त वृक्षारोपण;

भुसावळ (प्रतिनिधी ) –येथील पोस्ट ऑफिस तथा टपाल कार्यालयाने गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे काम केले आहे. शासनाच्या विविध योजना प्रत्येकापर्यंत पोहोचून …

युनियन बँकेच्या भोंगळ कारभारामुळे महिला स्वंय सहाय्यता ग्रामीण भागातील बचतगटांना खाते ओपनिंगचा प्रश्न ऐरणीवर

खडका प्रतिनिधी- भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील खडका येथीलमहिला स्वयं सहाय्यता बचतगटा अंतर्गत ग्रामीण भागातील महिलाचे युनियन बँकेत कारभारामुळे महिला स्वंय सहाय्यता ग्रामीण भागातील बचतगटांना खाते …

अरण्यवाचनात घडले विविधांगी प्रजातींचे दर्शन ; वन्यजीव संरक्षण सप्ताहानिमित्त कुऱ्हे पानाचे वनखंडात अभ्यासदौरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )- वन्यजीव संरक्षण सप्ताहानिमित्त भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे वनक्षेत्र विभाग, वन्यजीव संरक्षण संस्था आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे 2 ते …

भुसावळ विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयात कोविड १९ विरुध्द जन आंदोलन अभियानाची शपथ

भुसावळ (प्रतिनिधी )-विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयात  कोविड १९ विरुध्द लढा देण्यासाठी जन आंदोलन अभियानाची शपथ दिनांक ८ रोजी मुख्यालयाच्या आदेश नुसारसर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना …

विविध ज्वलंत समस्या तसेच प्रश्न सोडविण्यासाठी, बहुजन वंचित आघाडीतर्फे मागण्यांचे निवेदन सादर

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरामध्ये गेल्या तीन वर्षापासून संथ गतीने सुरू असलेले अमृत योजनेचे काम आणि पंचशील नगरातील दलित वस्तीतील अनेक गरजू पंचशीलनगर वासियांना अनेक दिवसापासून घरकुल …

बाटूच्या परीक्षा सुरळीत संपन्न; कुलगुरू प्रा. वेदला रामाशास्त्री यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक

भुसावळ (प्रतिनिधी )- डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारेच्या अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा आज संपन्न झाल्या. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे हे सर्वच विद्यापीठांसाठी मोठे …

अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांची भुसावळला भेट ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव जिल्ह्याचे नुतन अप्पर पोलिस अधिक्षकचंद्रकांत गवळी यांनी गुरुवार रोजी भुसावळ शहरातील शहर,बाजारपेठ व तालुका पोलिस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली.यावेळी बाजारपेठचे पोलिस …

पुणे-मुंबई दरम्यान शुक्रवारपासून पुन्हा धावणार डेक्कन क्वीन व इंद्रायणी एक्सप्रेस

मुंबई :पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन व इंद्रायणी एक्स्प्रेस या दोन रेल्वेगाड्यांसह महाराष्ट्रातील ९ ऑक्टोबर शुक्रवार पासून पाच मार्गांवर पुन्हा गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य …

दिपनगर प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्यावा ; मनसेची मागणी ; प्रकल्पासमोर निदर्शने ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दिपनगर विद्युत प्रकल्पात स्थानिक बेरोजगार तरुणांना डावलून परप्रांतीयांना काम दिली जात आहे. तर स्थानिक तरुण रोजगारासाठी दारोदार भटकंती करीत आहे. त्यामुळे यापुढे ६६० …

जळगाव जिल्ह्यात कलम 37 चे पोटकलम (1) व (3)लागू

जळगाव – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 21 ऑक्टोबर, 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) …

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव ; डॉ. मानवतकर बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम : जे. टी अग्रवाल यांचा शिक्षण महर्षी पुरस्काराने सन्मान भुसावळ (प्रतिनिधी )- शिक्षकदिनाचे औचित्य साधून येथील डॉ. मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२० ने गौरव करण्यात आला. तसेच जे. टी अग्रवाल यांचा शिक्षण महर्षी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक शिक्षकदिनी दिनांक ऑक्टोबर रोजी पुरस्कार प्रदान सोहळा सोशल डिस्टंसच्या नियमांचे पालन करून संपन्न झाला. नि:स्वार्थ भावनेने ज्ञानदान आणि विद्यार्थी घडवण्याचे कार्य अविरत करीत असणाऱ्या भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद नगरपालिका, खाजगी व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय, तंत्र शिक्षण, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रात अध्यापनाचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. आदर्श संस्कारक्षम पिढी कळविण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे. टी. अग्रवाल यांना प्रज्ञासूर्य शिक्षण महर्षी पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूणा शिरीष चौधरी होत्या. विशेष अतिथी व वक्ते म्हणून बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील, सेंट्रल रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी, डॉ. मानवतकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधू राजेश मानवतकर, उपाध्यक्ष डॉ. राजेश मानवतकर उपस्थित होते. महामंडलेश्‍वर जनार्दन हरी महाराज यांनी ऑनलाईन ऑडिओ पद्धतीने शिक्षकांशी संवाद साधला. पुरस्कारार्थी प्रतिनिधी म्हणून मनोज भोसले, संध्या भोळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मधू मानवतकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिशीर जावळे यांनी केले. यशस्वीतेसाठी कृपा महाजन, दामिनी पाटील, सतीश महाजन, देवेंद्र राजपूत, आर. के. कोळी, मनोज यादव, संतोष मौर्य, बाळू पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् राष्ट्रगीताने झाली. शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण – महामंडलेश्वर महंत आचार्य स्वामी जनार्दन हरीजी महाराज शिक्षकदिनाचे औचित्य साधून डॉ. मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रदान करण्यात येत असलेल्या पुरस्काराच्या निमित्ताने कामाची दखल घेऊन देण्यात येणारे पुरस्कार हे जबाबदारीचे भान देत असतात. आज समाजात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून भावी पिढीची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर असल्याचे महामंडलेश्वर महंत आचार्य स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी ऑडिओ संदेशातून सांगितले. क्षमता विकासासाठी अध्यापनाकडून अध्ययनाकडे – डॉ. जगदीश पाटील वय आणि वर्ग याला अनुसरून मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांमध्ये क्षमता निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांची भूमिका फक्त शिकवणे एवढीच राहणार नाही तर त्यासोबतच एक समुपदेशक, क्षमता निर्मिती करणारा, कुशल व तज्ज्ञ प्रशिक्षक आणि अध्यापनाकडून अध्ययनाकडे वाटचाल करणारा अशी विविधांगी भूमिका शिक्षकांना निभवावी लागणार आहे. अध्यापन ही संकल्पना मागे पडत असून विद्यार्थी स्वतः अध्ययन करील अशी परिस्थिती शिक्षकांना निर्माण करावी लागणार आहे. समाजाचा पाया घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याने संपूर्ण समाज आजही शिक्षकांकडे प्रतिष्ठापूर्वक नजरेने पाहत आहे, असे बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. डॉ. मानवतकर दांपत्याचे शिक्षणप्रेम कौतुकास्पद – प्राचार्य सतीश कुलकर्णी गेल्या वर्षापासून डॉ. मानवतकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे आयोजित प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक पुरस्कार व प्रज्ञासूर्य शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. वैद्यकीय सेवेबरोबरच शिक्षण सेवा करून शिक्षणाविषयीचे त्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्राचार्य सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. कौशल्यपूर्ण व व्यावसायिक शिक्षणावर भर – प्राचार्या डॉ. अरूणा चौधरी शिक्षणक्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांच्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्यपूर्ण व्यवसायिक शिक्षणावर भर देण्यात येत आहे. जेणेकरून उद्याचा सक्षम व जबाबदार नागरिक तयार होऊ शकेल. त्यासाठी शिक्षकांनी देखील राष्ट्रनिर्मितीचे कार्य या दृष्टिकोनातून शिक्षकी पेशाकडे पाहावे. मूल्याधारित शिक्षण संस्कृती जोपासून आदर्श विद्यार्थी घडविणारे शिक्षक हा समाजातील अविभाज्य घटक असल्याचेही डॉ. अरूणा चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगतातून सांगितले.

56 भुसावळ (प्रतिनिधी )-शिक्षकदिनाचे औचित्य साधून येथील डॉ. मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२० ने गौरव …