यावल –
देशाच्या रक्षणासाठी बलीदान देणाऱ्या शहीद जवानांचे वृत्त आपण नेहमी वाचत असतो, यातच पुलवामा सारख्या भ्याड हल्यातील त्या क्रुर आठवणीमुळे शहीद जवानांचे बलिदान कधीच विसरू शकणार नाही. जान हथेली पे घेवून , खर तर प्रत्येक जवान देशाचे रक्षण करीत असतात . अश्या खड़तर परिस्थितीत लवकर तरुण मुले सुद्धा सैन्यात भरती होण्याचे धाडस करीत नाही मात्रशप्रेम आणि बलिदानाचा मेळ साधत जिल्ह्यातील रावेर यावल मतदार संघातील व्यास नगर, यावल येथील रहिवासी भारत मातेची सुपुत्री कु .विद्या नारेकर हिने आत्मविश्वास ,जिद्द , मेहनत व चिकाटी तसेच देशप्रेम हे गुण अंगी आत्मसाद करून ध्येय गाठले. नुकतीच विद्याची
सीमा सुरक्षा बलात निवड झाली आहे . तिच्या ह्या धाडसी निर्णय व यशाचे विशेष कौतुक करून आमदार शिरीषदादा चौधरी व यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी देशाचे रक्षणासाठी जाणाऱ्या विद्यास शुभेच्छा दिल्यात .
यावल येथील रहिवासी कु. विद्या नारेकर हिचे बालपणीच पितृछ्त्र हरवले आणि त्यात घरात अठराविश्र्व दारिद्र्य , अत्यंत गरीबीची परिस्थिती मात्र न डगमगता जिद्दीने परिस्थितीवर मात करत विद्याने सदर यश संपादित केलं. या यशाबद्दल विद्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .



