मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्याद्वारे चाळीसगाव-भुसावळ तिसऱ्या लाईनचे निरीक्षण ;


भुसावळ ,(प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय मित्तल यांनी आज दिनांक 24.02.2021 रोजी चाळीसगाव-भुसावळ तिसरी लाईनचे विंडो ट्रेलिंग द्वारा निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षण मध्ये त्यांनी तिसऱ्या लाईनच्या कार्याचा आढावा घेतला.
भुसावळ येथे नविनिकृत करण्यात आलेले श्वान पथक (डॉग स्काड) रेल सुरक्षा बल ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले तसेच रेल्वे खेल-कूद मैदानाचे निरीक्षण करण्यात आले.
या निरीक्षण मध्ये मंडल रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. या निरीक्षण दोऱ्यात कोवीड संबंधित सर्व नियमाचे पालन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *