जळगाव –
पाचोरा न्यायालयात वारस दाखल्याचे प्रकरण दाखल करण्याकामी लोहारी, ता.पाचोरा येथील शेत मिळकती व घर मिळकतींच्या एकूण आठ उतार्यांचे मुल्यांकन दाखला मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर मूल्यांकन दाखला देण्याच्या मोबदल्यात 700 रुपयांची लाच स्वीकारणार्या पाचोरा दुय्यम निबंध कार्यालयातील प्रभारी सहाय्यक दुय्यम निबंधक ज्ञानदेव साहेबराव चव्हाण (46, रा.संभाजी नगर, पाण्याच्या टाकीजवळ, पाचोरा) यास जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी कार्यालयात अटक केल्याने खळबळ उडाली आहे . हा सापळा जळगाव एसीबीच्या उपअधीक्षक गोपाल ठाकुर, निरीक्षक निलेश लोधी, निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय रवींद्र माळी, उपनिरीक्षक अशोक अहीरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, नाईक मनोज जोशी, जनार्धन चौधरी, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने यशस्वी केला.



