वाशीम | राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली आहे. दरम्यान, वाशीम येथील वसतिगृहातील 229 विद्यार्थी आणि 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या वसतिगृहात अमरावती, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला येथील एकूण 327 विद्यार्थी राहतात.

वाशिम जिल्ह्यातील देगाव परिसरात एक आदिवासी निवासी शाळा आहे. या शाळेतील 327 पैकी एकूण 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विद्यार्थ्यांसह चार कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना झालेले बहुतांश विद्यार्थ्यांचे वय हे 13 ते 15 इतके आहे. तसेच बहुतांश विद्यार्थी हे अमरावती जिल्ह्यातील धारणी,अचलपूर आणि मेळघाट पट्टयातील भागातील आहेत.


