भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील साकरी येथील एका विधवा महिलेस भुसावळ तहसील कार्यालयातून अर्थसहायता योजनेतंर्गत २० हजाराचा धनादेश
इंगळे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला .
साकरी येथे गरीब कुटुंबातील महिला रुपाली अतुल खाचणे यांच्या पतीचे पाच महिन्यापूर्वी निधन झाले . रुपाली खाचनेसह घरात त्यांच्या तिन मुली तसेच वृद्ध सासु व सासरे असा परिवार आहे . कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा यांची चिंता सतावीत असतांना या गरीब महिलेच्या पाठिशी सिआरपी प्रतिभा दशरथ जावळे यासख्ख्या बहिणी प्रमाणे उभ्या राहिल्या जावळे यांनी अर्थ सहायता योजनेच्या माध्यमातून
मदतीचा हात देत विधवा महिला रुपाली खाचने यांचे मदत निधी प्रकरण तहसील कार्यालयात जमा केले व सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्ना यश आले व आज दिनांक 25 रोजी तहसील कार्यालयातुन श्री इंगळे यांच्या हस्ते विस हजार रुपयांचा धनादेश श्रीमती रुपाली खाचने यांचे सुपुर्द केला .



