युवारंग 2026-27 मध्ये नाहाटा महाविद्यालयाची दैदीप्यमान कामगिरी; एकूण ११ पारितोषिकांची कमाई

भुसावळ (प्रतिनिधी )-युवारंग 2026-27 या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवामध्ये भुसावळ कला, विज्ञान व पू. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाने विविध कला प्रकारांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश संपादन केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संगीत व नाट्य विभागातील विविध स्पर्धांमध्ये आपली कला, कौशल्य आणि प्रतिभेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत एकूण ११ पारितोषिके प्राप्त केली. या यशामुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे.
संगीत कला प्रकारातील यश
संगीत विभागात ऋषिकेश उमेश ढोमणे याने अभ्यंकर सुगम गीत गायन स्पर्धेत तृतीय, अभ्यंकर नाट्यगीत गायन, शास्त्रीय गायन, भारतीय सुगम गायन आणि नाट्यगीत गायन एकल या चार स्पर्धांमध्ये द्वितीय पारितोषिक प्राप्त केले. अर्जुन विठ्ठलराव नागवे याने भारतीय शास्त्रीय तालवाद्य स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळविले.
प्रगती किशोर तांबट हिने पाश्चात्य गायन एकल स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले. तसेच पाश्चात्य समूहगीत स्पर्धेत द्वितीय आणि भारतीय समूहगीत स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या संघात प्रगती किशोर तांबट, अनुष्का विजय आंबेकर, करुणा आत्माराम बाऱ्हे, युक्ती नवीन चौरडिया आणि स्वरा बेलोकर यांचा सहभाग होता.
नाट्य विभागा मध्ये
नाट्य विभागात स्वरा संदीप बेलोकर हिने मिमिक्री स्पर्धेत तृतीय पारितोषिक प्राप्त केले. तसेच प्रहसन स्पर्धेत चेतन दिलीप चौधरी, रिया मिस्तरी, निशिता ठाकूर, अक्षय चत्रत, कांचन खुपसे आणि रोहित लोलके यांच्या संघाने तृतीय पारितोषिक मिळविले. तसेच महाविद्यालयास
स्व. वसुंधरा चौधरी स्मृती प्रोत्साहन पर युवारंग 2026 -27  फिरता चषक  मिळाला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन  फलक, चेअरमन श्री. महेश  पालक, सचिव श्री. विष्णू  चौधरी तसेच श्री. संजयजी नाहाटा(कोषाध्यक्ष) यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य दीपक पाटील , डॉ. जी. आर. वाणी व कला मंडळ प्रमुख प्रा . डॉ.प्रफुल्ल इंगोले यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. कार्यालयीन अधीक्षक श्री. भगवान तायडे, श्री. सचिन पाटील, श्री. मुकेश फिरके, श्री. विनीत पाटील आदींनीही या यशासाठी सहकार्य केले.
युवारंग 2026-27 साठी महाविद्यालयाच्या संघप्रमुख म्हणून प्रा. विलास सोळुंके व प्रा. डॉ. वंदना नेमाडे यांनी, तर सह समन्वयक म्हणून प्रा .डॉ. शलाका निकम यांनी जबाबदारी पार पाडली.
 
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे महाविद्यालयाचे सकारात्मक वातावरण, प्राध्यापकांचे मार्गदर्शन, व्यवस्थापनाचे पाठबळ आणि सर्व सहकाऱ्यांचे योगदान यामुळेच हे यश शक्य झाले. महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.