भुसावळ (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने २१ वी १७ वर्षांखालील मुला-मुलींची सब ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान कळंब (जिल्हा धाराशिव, ) येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा मुलांचा व मुलींचा संघ निवडण्यासाठी गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी भुसावळ येथे जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सेंट अलॉयसियस शाळेच्या मैदानावर दुपारी ४ वाजता ही निवड चाचणी होणार आहे. १ ऑक्टोबर २०१० नंतर जन्मलेल्या पात्र खेळाडूंना या निवड चाचणीत सहभागी होता येणार आहे. निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी स्वतःची क्रिकेट बॅट, क्रिकेट गणवेश, वयाचा दाखला आणि आधारकार्डची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. कळंब येथील तालुका क्रीडा संकुलात १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे निवड झालेले संघ सहभागी होतील. या राज्यस्तरीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनियर स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी खेळाडूंना मिळणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील १७ वर्षांखालील पात्र मुला-मुलींनी मोठ्या संख्येने निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहिती क्रीडा शिक्षक मेघश्याम शिंदे 9823298216 जिल्हा सचिव वासेफ पटेल 9673171786 यांच्याशी संपर्क साधावा


