जय मातृभूमी पक्षाची राष्ट्रीय बैठक संपन्न ;


भुसावळ, :

वरणगाव व जिल्ह्यातील इतर पालिका निवडणूक संदर्भात जय मातृभूमी पक्षाची राष्ट्रीय बैठक नुकतीच भुसावळ येथे संपन्न झाली.
जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच भविष्यात येवू घातलेल्या वरणगाव सहित सर्वच नगर पालिका निवडणूक लढविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भुपेश बाविस्कर म्हणाले की, येणाऱ्या वरणगाव पालिका निवडणूक पक्ष पूर्ण ताकदीने लढेल. पक्ष सर्वच वार्डात उमेदवार उभे करणारा आहे. थोड्याच दिवसात वरण गाव पालिका निवडणूक संधार्भात वरणगावात पक्षाची बैठक घेऊन पुढील रणनिती ठरविण्यात येणार आहे.
या वेळी पक्षचे उपाध्यक्ष योगेश दलाल, सचिव सचिव कोष्टी, मनिष कुमार वर्मा यांनी मार्गदर्शन केलं. या वेळी किरण बोलके, ऍड. प्रमोद केदारे, विजय निंभोरे, ललित महाजन, महिला जिल्हा अध्यक्ष कृष्णासिंग आर. ठाकूर व पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *