जळगाव : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे तब्बल 363 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1379 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 59 हजार 585 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 56 हजार 416 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर बुधवारी एकाच दिवसात 137 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात तब्बल दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

बुधवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 164
जळगाव ग्रामीण 06
भुसावळ 06
अमळनेर 24
चोपडा 30
पाचोरा 03
भडगाव 03
धरणगाव 03
यावल 02
एरंडोल 11
जामनेर 03
रावेर 08
पारोळा 17
चाळीसगाव 53
मुक्ताईनगर 18
बोदवड 09
अन्य जिल्हा 03
24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात भुसावळ तालुक्यातील 64 व 74 वर्षीय पुरूषाचा डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला


