सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवासाठी १,५०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त; ३११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ; १३ ते १४ लाख भाविक येण्याचा अंदाज; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांची जय्यत तयारी ;

नाशिक प्रतिनिधी : कळवण तालुक्यातील श्री सप्तशृंगी गडावर होणाऱ्या नवरात्रोत्सव आणि कोजागिरी पौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. …

मंत्री संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश; भुसावळात लवकरच उभारणार ‘उमेद मॉल’! महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ; १९ कोटी ९९ लाख ९९ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

भुसावळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत भुसावळ येथे उभारण्यात येणाऱ्या ‘उमेद मॉल’ या जिल्हा विक्री केंद्राच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने …

मध्य रेल्वेची विनातिकीट प्रवाशांविरुद्ध मोठी कारवाई; २०.४७ लाख;’ लोकल १५९.३४ कोटींचा दंड वसूल ;

भुसावळ विभागाची दमदार कामगिरी; ३.७७ लाख प्रकरणांतून ३८.९० कोटी रुपयांचा दंड भुसावळ (प्रतिनिधी)- ७ लाख प्रकरणे नोंदविण्यात आली असून, दंडवसुली १५९.३४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. …

भुसावळात खुनाच्या गुन्ह्यातील दोघे अवघ्या दोन तासांत जेरबंद; तिसऱ्या आरोपीचाही सहभाग निष्पन्न ; साक्री फाटा येथील फार्म हाऊसवर तरुणाची हत्या; पैशांच्या वादातून गुन्हा घडल्याची फिर्यादीत नोंद ;

भुसावळ प्रतिनिधी : शहरातील साक्री फाटा परिसरातील फार्म हाऊस येथे एका तरुणाला मारहाण करून त्याची हत्या केल्यानंतर मृतदेह राष्ट्रीय महामार्गालगत अलीशान वॉटर पार्कसमोरील ब्रिजजवळील सर्व्हिस …

शिक्षणाबरोबर संस्कार आणि संस्कृती टिकवणे महत्त्वाचे-आमदार नंदकिशोर महाजन

भुसावळ (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच त्यांच्या मनावर संस्कार रुजविणे आणि संस्कृतीचे जतन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जळगाव मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य …

मध्य रेल्वे पुणे विभागात डीसीएन कामासाठी काही गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन व ओरिजिनेशन

भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे यार्ड तसेच पुणे–दौंड विभागातील विद्यमान लेआउटमध्ये बदल करण्यासाठी डीसीएन कामाकरिता विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे भुसावळ …

केळी पीकविम्याप्रकरणी वरणगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर झालेला अन्याय खपवून घेणार नाही ! पीकविमा कंपनीला धडा शिकवू ; शेतकऱ्यांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू – शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन :

भुसावळ (प्रतिनिधी) : केळी पीकविम्याच्या भरपाईप्रकरणी वरणगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत, त्यांना त्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली …

आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याने शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची कार्यवाही सुरू ; भविष्यातील पाणी टंचाईचा विचार; १०० टक्के पाणीसाठा करण्याच्या सूचना ;

यावल (प्रतिनिधी)- शेळगाव बॅरेजमध्ये यंदा पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. आमदार अमोल जावळे यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळास पत्र देऊन शेळगाव …

भुसावळच्या मैदानावर युवा खेळाडूंचा दमदार ठसा : तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

भुसावळ (प्रतिनिधी)- सेवा संकल्प अभियानांतर्गत क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव, पंचायत समिती भुसावळ …

उजेड पेरणारी माणसं’ पुस्तकाचे शीर्षक काळजाला भिडते ; जळगावात राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा विश्वास :

जळगाव (प्रतिनिधी )- समाजमाध्यमे आणि रीलच्या जाळ्यात आजची नवी पिढी गुरफटलेली असून वाचनाची आवड कमी होत चालली आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही ‘उजेड पेरणारी माणसं’ …

पर्यावरण प्रेमी नाना पाटील सर यांना निसर्गोपचार गौरव सन्मान

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ येथील सुप्रसिद्ध पर्यावरण प्रेमी पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष निसर्गोपचार तज्ञ नाना पाटील सर यांना नुकताच रविवार रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, …

आर्या फाउंडेशनतर्फे ‘ड्रग फ्री डिस्ट्रिक्ट अभियान २०२६’चे आयोजन ; भुसावळमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; ३३ सामाजिक संस्था व माध्यम प्रतिनिधींचा सन्मान ;

भुसावळ (प्रतिनिधी) : आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनतर्फे ‘ड्रग फ्री डिस्ट्रिक्ट अभियान २०२६’ अंतर्गत लोणारी समाज मंगल कार्यालय, भुसावळ येथे व्यसनमुक्ती जनजागृती व सन्मान सोहळ्याचे आयोजन …

भुसावळात पोलिसांची मॉक ड्रिल; आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ;

आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांच्या प्रतिसादाची घेतली चाचणी; पोलीस, आरसीपी, महसूल व रुग्णवाहिका पथकाचा सहभाग भुसावळ ( प्रतिनिधी )- आगामी नवरात्रोत्सव तसेच विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर …

वारली चित्रकलेतून ग्रामीण कलेचे व संस्कृतीचे दर्शन – रजनी सावकारे ;

भुसावळ, ता. ६ (प्रतिनिधी )-: वारली चित्रकलेतून ग्रामीण जीवन, संस्कृती, परंपरा आणि आदिवासी जीवनशैलीचे सुंदर दर्शन घडते. आजच्या मोबाईलच्या युगात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मोबाईलमध्ये …

साकेगावच्या सराफ फार्मसी कॉलेजात धाडसी चोरी; दीड लाखांची प्रवेश फी लंपास ; कार्यालय व प्राचार्यांच्या केबिनचे कडी-कुलूप तोडले; चोरट्याने ठराविक ड्रॉवरच केला लक्ष्य;

भुसावळ, (प्रतिनिधी )-साकेगाव येथील सराफ फार्मसी कॉलेजच्या कार्यालयात मध्यरात्री धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने कार्यालयासह प्राचार्यांच्या केबिनचे कडी-कुलूप तोडून १ लाख ५७ …

सावधान! पाणी जपून वापरा; राज्यात १६ ऑक्टोबरपासून किमान १० टक्के पाणीकपात ; २०२७ पर्यंत जलसाठ्याचे नियोजन; पिण्याचे पाणी, जनावरे आणि चाऱ्याला सर्वोच्च प्राधान्य :

भुसावळ (प्रतिनिधी) : राज्यातील कमी पर्जन्यमान आणि अल निनोच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. जलसंपदा …

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सत्कार ; जळगाव शहरात सदिच्छा भेट; समाजातील विविध प्रश्नांसह युवक व महिला सक्षमीकरणावर चर्चा ;

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जळगाव शहरात प्रथमच आगमन झाले असता, प्रदेश तेली समाजाच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेऊन सन्मान …

पुणे-दानापूर एक्स्प्रेसमधील मोबाईल चोरीचा तपास; छत्तीसगडचा चोरटा १३ मोबाईलसह जेरबंद; भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई; २ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त ;

भुसावळ, (प्रतिनिधी ) : पुणे-दानापूर स्पेशल एक्स्प्रेसमधील प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारीचा तपास करताना भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या सीपीडीएस पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा माग काढला. …

दुष्काळ पंचनाम्यांवरून आमदार अमोल जावळे आक्रमक ;

बामणोद/फैजपूर येथील तलाठी व सर्कल कार्यालयांना अचानक भेट; अनावश्यक कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक न करण्याच्या सूचना भुसावळ (प्रतिनिधी)- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू असताना …

उजेड पेरणारी माणसं’चे बुधवारी राज्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन : अनुसूचित जाती-जमाती आयाेगाचे माजी सदस्य किशाेर मेढे उपस्थित राहणार

जळगाव (प्रतिनिधी)-: पुण्याच्या पेन पब्लिशिंग हाऊसने भुसावळ येथील आनंदा पाटील यांच्या ‘उजेड पेरणारी माणसं’ या ललित व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ …

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे- डॉ. जगदीश पाटील :

स्वर्गीय स्वप्नील ललवाणी स्मृती दिनानिमित्त कुऱ्हे पानाचे येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ; भुसावळ (प्रतिनिधी)- स्व. स्वप्नील ललवाणी यांच्या स्मृती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना देण्यात येणारी वही …