लोक चित्रकला सर्व जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे- सतीश वर्मा

भुसावळ (प्रतिनिधी )- दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर , सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांचे वतीने भुसावळ येथे वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ब्राह्मण संघ भुसावळ …

स्व.हरिभाऊ जावळेंच्या जयंतीनिमित्त दुष्काळावर जाणीव-जागृतीसाठी कार्यकर्ता अभ्यास वर्ग ; फैजपूर येथे ३ ऑक्टोबर रोजी आयोजन ;

भुसावळ /फैजपूर (प्रतिनिधी)- माजी खासदार तथा आमदार कृषीमित्र स्वर्गीय हरिभाऊ माधव जावळे यांच्या जयंतीनिमित्त ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता फैजपूर येथील शुभ दिव्य लॉन …

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महिला क्रीडा मंडळाचा पुढाकार ; नालंदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आश्रमशाळेला २ हजार लिटरची पाण्याची टाकी भेट; वृक्षारोपणासह विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप;

भुसावळ (प्रतिनिधी) : ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने महिला क्रीडा मंडळ, भुसावळतर्फे तालुक्यातील …

संकटांकडे संधी म्हणून पाहा; पत्रकारांनी नव्या आव्हानांना सामोरे जावे – व्हॉईस ऑफ मीडियाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय केडर कॅम्पमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांचे आवाहन;

सांगली (प्रतिनिधी) : व्हॉईस ऑफ मीडियाचा जन्मच संकटातून झाला आहे. कोरोनासारख्या महाभयंकर संकटातून या संघटनेची निर्मिती झाली. त्यामुळे संकटे आली की त्यातून संधी निर्माण होते. …

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘माझ्या यशाची यशोगाथा’ व्याख्यान संपन्नकला क्षेत्रातील संधी, कौशल्यविकास व रोजगाराच्या वाटांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियानांतर्गत दादासाहेब रामदास गणपत झांबरे माध्यमिक विद्यालय, भुसावळ येथे ‘माझ्या यशाची यशोगाथा – प्रेरणादायी अनुभव, भविष्याची उज्वल दिशा’ या व्याख्यानाचे …

कंडारीतील गौतम नगर येथे विधी सेवा प्राधिकरणाचा जनजागृती कार्यक्रमPOCSO कायदा, महिला सुरक्षा, एचआयव्ही, व्यसनमुक्ती व बालविवाहाबाबत महिलांना मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुका विधी सेवा प्राधिकरण, भुसावळ यांच्या दिनदर्शिकेनुसार २९ सप्टेंबर २०२६ रोजी कंडारी येथील गौतम नगर परिसरात विविध कायदे व सामाजिक विषयांवर जनजागृती …

लाच मागितल्याच्या आरोपावरून पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आदेश; चौकशी दरम्यान २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप ;

जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश एकनाथ चौधरी यांच्यावर चौकशीदरम्यान तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात …

ज्येष्ठ नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहावे : डीवायएसपी केदार बारबोले

भुसावळ ( प्रतिनिधी)- ज्येष्ठ नागरिकांनी सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांपासून सावध राहावे तसेच अनोळखी व्यक्तींचे फोन, लिंक, ओटीपी आणि बँक खात्याशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नये, …

भुसावळ विभागात कॅटरिंग सेवांच्या सुधारणा व प्रवासी सुविधांबाबत कॅटरिंग परवानाधारकांसोबत बैठक ;

भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील कॅटरिंग सेवांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सुविधांमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या उद्देशाने दिनांक 30.09.2026 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, …

नाहाटा महाविद्यालयात मूकनाट्य व प्रहसन कार्यशाळा संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या सर्जनशीलता, अभिनयकौशल्य आणि अभिव्यक्ती क्षमतेला चालना मिळावी, या उद्देशाने भुसावळ कला, विज्ञान व पी. ओ. नाहाटा …

सेवा संकल्प अभियानांतर्गत खंडाळा येथे महावितरणचे सेवा शिबिर ;

भुसावळ (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाच्या परिपत्रकानुसार आणि ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत भुसावळ ग्रामीण उपविभागातील शिंदी कक्षांतर्गत खंडाळा येथे महावितरणतर्फे विशेष सेवा शिबिराचे आयोजन …

पळासखेडे आश्रमशाळेत १०० वृक्षांची लागवडकिमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पळासखेडे, ता. बोदवड (प्रतिनिधी) : पर्यावरणाचे संवर्धन तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने पळासखेडे येथील शासकीय आश्रमशाळेत किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने १०० विविध प्रकारच्या …

उपवर्गीकरण विरोधी मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा – ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी )-अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे लचके तोडणाऱ्या व या प्रवर्गातील सर्व ५९ जातींच्या प्रगतीचा मार्ग रोखण्या करिता केल्याजात असलेल्या उपावर्गिकरणाचा डाव हाणून पाडण्या करिता महाराष्ट्रात …

खळबळ : भुसावळ तालुक्यात पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार ;

साकेगाव बसस्थानकाजवळील घटना; एकाची प्रकृती चिंताजनक, संशयित हल्लेखोरांचा शोध सुरु; भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे जुन्या वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला …

खान्देशचा आवाज काश्मीरच्या नंदनवनात गुंजणार ! महाराष्ट्रातून तुषार वाघुळदे यांची निवेदकपदी निवड ;

महाराष्ट्रातून तुषार वाघुळदे यांची ‘पहिल्या राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलना’च्या प्रमुख निवेदकपदी निवड ; भुसावळ/श्रीनगर (प्रतिनिधी) : काश्मीरच्या नयनरम्य खोऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘पहिल्या राष्ट्रीय कराओके …

टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाची बैठक : पाणीपुरवठा, चारा, पीक नोंदणी व पंचनाम्यांबाबत अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील संभाव्य टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार टंचाई कृती आराखड्याबाबत ऑनलाइन बैठक घेण्यात आली. यावेळी पिण्याचे पाणी, शेती, पशुधनासाठी …

घरातच उरकले १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न; २८ वर्षीय पतीसोबत दोघेही बेपत्ता ; पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथील प्रकार; मोठ्या बहिणीची पोलिसांत तक्रार, तपास सुरू

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे २८ वर्षीय तरुणासोबत घरातच लग्न लावून दिल्याचा आरोप समोर आला आहे. लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून …

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आ.अमोल जावळे आक्रमक; दुष्काळ जाहीर करण्याची मागणी :

भुसावळ (प्रतिनिधी )- नाशिक येथे झालेल्या आढावा बैठकीत रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा जावळे यांनी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरदार आवाज उठवत ठामपणे विविध मागण्या …

भुसावळात पोलिसासाठी ३० हजारांची लाच मागणी भोवली ! खाजगी पंटर अमन सनसोये जळगाव एसीबीच्या जाळ्यात; संशयित पोलीस कर्मचाऱ्याचा शोध सुरू

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी तसेच तक्रारदाराला आरोपी न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक …

पदाचा दुरुपयोग केल्याच्या तक्रारीवरून मंडळ अधिकाऱ्या विरोधात विभागीय चौकशी सुरू ; केदारनाथ सानप यांच्या तक्रारीची प्रशासनाकडून दखल ;

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी मंडळ अधिकारी प्रविण लक्ष्मण …

कुऱ्हा पानाचे येथे रेशन दुकानावर प्रशासनाची धाड, नागरिकांच्या तक्रारीनंतर पुरवठा अधिकारी मैदानात ;

भुसावळ (प्रतिनिधी) : कुऱ्हा पानाचे येथील स्वस्त धान्य दुकानात गेल्या दोन महिन्यांपासून धान्य मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर आवाज उठवला. नागरिकांच्या सामूहिक तक्रारीची दखल …