जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जळगाव शहरात प्रथमच आगमन झाले असता, प्रदेश तेली समाजाच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेऊन सन्मान करण्यात आला. यावेळी समाजबांधवांनी उत्स्फूर्त स्वागत करत त्यांचा सत्कार केला. या सदिच्छा भेटीदरम्यान तेली समाजातील विविध विषयांवर तसेच युवक आणि महिलांच्या सक्षमीकरणाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. समाजाच्या विविध अपेक्षा व प्रश्न यावेळी पदाधिकाऱ्यांनी मंत्री बावनकुळे यांच्यासमोर मांडले. यावेळी नाशिक विभागीय युवक अध्यक्ष (प्रदेश तेली महासंघ) प्रशांत सुरळकर, नाशिक विभागीय युवक कार्याध्यक्ष विनोद चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष निर्मलाताई चौधरी, जळगाव शहर महानगरप्रमुख (महिला) मनीषाताई चौधरी तसेच शहरप्रमुख धनंजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रवींद्र चौधरी, प्रदीप चौधरी, योगराज चौधरी, शिवाप्पा चौधरी, वैभव चौधरी, आरोग्यदूत शिवाजी पाटील, प्रमोद चौधरी, दीपक मंडवले यांच्यासह तेली समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


