बाबासाहेबांच्या भालोद भेटीचे महत्व लक्षात घेता तिथं ‘ प्रेरणा स्तंभ ‘ उभारण्यात यावा – जयसिंग वाघ

 भालोद (प्रतिनिधी) :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २२ ऑक्टोबर १९२९ रोजी शासकीय कामकाजाचा भाग म्हणून भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल ची पाहणी करून शाळेच्या कामकाजावर समाधान व्यक्त करणारा अभिप्राय शाळेच्या दप्तरात नोंदविला आहे . शाळेच्या तपासणी करीता बाबासाहेब आले असता भालोद च्या जनतेने त्यांचे जोरदार स्वागत केले आहे . बाबासाहेबांनी जनतेला मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे . बाबासाहेबांची ही भालोद भेट प्रेरणादायी असल्याने या गावी ' प्रेरणा स्तंभ ' उभारण्यात यावा अशी आग्रही मागणी प्रसिद्ध साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते जयसिंग वाघ यांनी केली आहे .
       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भालोद भेटीची आठवण म्हणून भीम स्मृती संवर्धन समिती तर्फे भालोद येथील बुध्द विहारात अभिवादन सोहळ्यात मार्गदर्शन करतांना वाघ बोलत होते .
    जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात पुढं सांगितले की,  १९२९ मध्ये  बाबासाहेब हे ओ एच बी स्टार्ट समितीचे सदस्य व मुंबई विधान परिषदेचे सदस्य होते . अस्पृश्य व आदिवासी समाजाचे सामजिक , आर्थिक , शैक्षणिक मागासलेपणाची कारणे अभ्यासण्या करिता ते भालोद येथे आलेले आहेत . याच समितीच्या माध्यमातून अस्पृश्य व आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्या करिता विविध उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत . हा इतिहास सर्वाँना प्रेरणा देणारा आहे .
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळ भालेराव होते त्यांनी प्रेरणा स्तंभ उभारण्या करिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .
    या प्रसंगी प्रदीप सपकाळे  ( रावेर ) , मुकुंद सपकाळे  , बाबुराव वाघ , डॉ. उल्हास तासखेडकर , डॉ. प्रकाश वानखेडे ,  ॲड. आनंद कोचुरे , डॉ. चंद्रकांत भालेराव  यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सैंदाणे , प्रास्ताविक नथु अहिरे , स्वागत डॉ. गौतम नन्नवरे ,  डी. आर . वानखेडे , चेतन नन्नवरे , दिलिप सपकाळे ,  परिचय रमेश तायडे यांनी तर आभारप्रदर्शन रमेश भालेराव  यांनी केले .
    कार्यक्रमास दिलिप तासखेडकर , चंद्रगुप्त सुरवाडे ,  विशाल साळुंके , चंद्रशेखर अहिरराव , संतोष गायकवाड , सुरेश भालेराव , बेबीनंदा वाघ , मनीषा भालेराव  आदींसह स्त्री , पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.