भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ येथील सुप्रसिद्ध पर्यावरण प्रेमी पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष निसर्गोपचार तज्ञ नाना पाटील सर यांना नुकताच रविवार रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए जी एम ए व योगा निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशन मार्फत अतिशय प्रतिष्ठेचा निसर्गोपचार गौरव सन्मान 2026 मोठ्या थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भातृमंडळ हॉल बुलडाणा येथे देण्यात आला. निसर्गोपचारक यांच्या कार्याचा हा सन्मान होता या सन्मानाला महाराष्ट्रातील शेकडो निसर्गोपचार तज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये बुलडाणा मतदार संघातील लोकप्रिय आमदार मा.श्री संजयभाऊ गायकवाड, बुलडाणा नगर पालिका नगराध्यक्षा सौ पूजाताई गायकवाड,, डॉ सचिन सुपे, डॉ त्रिदीप गुहा,प्रा. डॉ. प्रशांत कपले, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापीठ, नागपूर. एम जी एम विद्यापीठाचे योगा विभाग प्रमुख श्री गंगाप्रसाद खरात,तर मंचावर प्रमुख उपस्थितीमध्ये आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन श्री नितीनराजे पाटील,आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बाबुराव कानडे, सौ दिशा चव्हाण,श्री विजय नवल पाटील,श्री विनोद ढोबळे,श्री रावसाहेब घोडेगाव,श्री रामेश्वर शिंदे,श्री.श्रीकांत अंजुटगी,श्री भानुदास परबत,श्री अशोक देवकर,संजय गवारे सौ स्मिता खारकर,श्री राहुल देशमुख,श्री आशिष सूर्यवंशी, व इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते. नाना पाटील सर निसर्गोपचार तज्ञ यांना सामाजिक व नैसगिक कार्य तसेच निसर्ग वनस्पती पासून उपचार औषधी वनस्पती चे संगोपन व निर्मिती अश्या कार्याचा मुळे त्यांना *निसर्गोपचार गौरव सन्मान 2026 मिळाल्या बद्दल* सर्व स्तरावरून नाना पाटील सर यांचे कौतुक होत आहे व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.


