पळासखेडे आश्रमशाळेत १०० वृक्षांची लागवडकिमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पळासखेडे, ता. बोदवड (प्रतिनिधी) : पर्यावरणाचे संवर्धन तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने पळासखेडे येथील शासकीय आश्रमशाळेत किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने १०० विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. पर्यावरण संवर्धनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी जिव्हाळा निर्माण करण्याच्या उद्देश या उपक्रमाचा होता.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. जास्वंदी भंडारी यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे असलेले महत्त्व समजावून सांगितले. ‘वृक्ष आपले मित्र का आहेत?’ याबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी वृक्षांमुळे पर्यावरणाचे संतुलन, शुद्ध हवा, पर्जन्यमान आणि जैवविविधता टिकविण्यास मदत होते, असे सांगितले. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या प्रत्येक झाडाची नियमित निगा राखणे आणि त्यांचे संगोपन करणे हीदेखील आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वृक्षारोपण उपक्रमात किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. जास्वंदी भंडारी, कोषाध्यक्ष जयश्रीताई देशमुख, ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या महिला विंगच्या उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख तथा पत्रकार उज्वला बागुल, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. रायभान तायडे, अधीक्षक पंकज फेगडे, श्री. पराग वारके, वृषाली लव्हाळे, श्रीमती सोनाली ढगे, श्री. नितीन सर, श्री. मातडे सर, श्री. दिलीप राठोड तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्षारोपण केले.
मुख्याध्यापक श्री. रायभान तायडे यांनी किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ तसेच पळासखेडे शासकीय आश्रमशाळेचे सहकार्य लाभले.