पुणे-मुंबई दरम्यान शुक्रवारपासून पुन्हा धावणार डेक्कन क्वीन व इंद्रायणी एक्सप्रेस

मुंबई :पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन व इंद्रायणी एक्स्प्रेस या दोन रेल्वेगाड्यांसह महाराष्ट्रातील ९ ऑक्टोबर शुक्रवार पासून पाच मार्गांवर पुन्हा गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य …

दिपनगर प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्यावा ; मनसेची मागणी ; प्रकल्पासमोर निदर्शने ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दिपनगर विद्युत प्रकल्पात स्थानिक बेरोजगार तरुणांना डावलून परप्रांतीयांना काम दिली जात आहे. तर स्थानिक तरुण रोजगारासाठी दारोदार भटकंती करीत आहे. त्यामुळे यापुढे ६६० …

जळगाव जिल्ह्यात कलम 37 चे पोटकलम (1) व (3)लागू

जळगाव – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 21 ऑक्टोबर, 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) …

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव ; डॉ. मानवतकर बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम : जे. टी अग्रवाल यांचा शिक्षण महर्षी पुरस्काराने सन्मान भुसावळ (प्रतिनिधी )- शिक्षकदिनाचे औचित्य साधून येथील डॉ. मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२० ने गौरव करण्यात आला. तसेच जे. टी अग्रवाल यांचा शिक्षण महर्षी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक शिक्षकदिनी दिनांक ऑक्टोबर रोजी पुरस्कार प्रदान सोहळा सोशल डिस्टंसच्या नियमांचे पालन करून संपन्न झाला. नि:स्वार्थ भावनेने ज्ञानदान आणि विद्यार्थी घडवण्याचे कार्य अविरत करीत असणाऱ्या भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद नगरपालिका, खाजगी व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय, तंत्र शिक्षण, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रात अध्यापनाचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. आदर्श संस्कारक्षम पिढी कळविण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे. टी. अग्रवाल यांना प्रज्ञासूर्य शिक्षण महर्षी पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूणा शिरीष चौधरी होत्या. विशेष अतिथी व वक्ते म्हणून बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील, सेंट्रल रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी, डॉ. मानवतकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधू राजेश मानवतकर, उपाध्यक्ष डॉ. राजेश मानवतकर उपस्थित होते. महामंडलेश्‍वर जनार्दन हरी महाराज यांनी ऑनलाईन ऑडिओ पद्धतीने शिक्षकांशी संवाद साधला. पुरस्कारार्थी प्रतिनिधी म्हणून मनोज भोसले, संध्या भोळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मधू मानवतकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिशीर जावळे यांनी केले. यशस्वीतेसाठी कृपा महाजन, दामिनी पाटील, सतीश महाजन, देवेंद्र राजपूत, आर. के. कोळी, मनोज यादव, संतोष मौर्य, बाळू पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् राष्ट्रगीताने झाली. शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण – महामंडलेश्वर महंत आचार्य स्वामी जनार्दन हरीजी महाराज शिक्षकदिनाचे औचित्य साधून डॉ. मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रदान करण्यात येत असलेल्या पुरस्काराच्या निमित्ताने कामाची दखल घेऊन देण्यात येणारे पुरस्कार हे जबाबदारीचे भान देत असतात. आज समाजात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून भावी पिढीची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर असल्याचे महामंडलेश्वर महंत आचार्य स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी ऑडिओ संदेशातून सांगितले. क्षमता विकासासाठी अध्यापनाकडून अध्ययनाकडे – डॉ. जगदीश पाटील वय आणि वर्ग याला अनुसरून मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांमध्ये क्षमता निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांची भूमिका फक्त शिकवणे एवढीच राहणार नाही तर त्यासोबतच एक समुपदेशक, क्षमता निर्मिती करणारा, कुशल व तज्ज्ञ प्रशिक्षक आणि अध्यापनाकडून अध्ययनाकडे वाटचाल करणारा अशी विविधांगी भूमिका शिक्षकांना निभवावी लागणार आहे. अध्यापन ही संकल्पना मागे पडत असून विद्यार्थी स्वतः अध्ययन करील अशी परिस्थिती शिक्षकांना निर्माण करावी लागणार आहे. समाजाचा पाया घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याने संपूर्ण समाज आजही शिक्षकांकडे प्रतिष्ठापूर्वक नजरेने पाहत आहे, असे बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. डॉ. मानवतकर दांपत्याचे शिक्षणप्रेम कौतुकास्पद – प्राचार्य सतीश कुलकर्णी गेल्या वर्षापासून डॉ. मानवतकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे आयोजित प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक पुरस्कार व प्रज्ञासूर्य शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. वैद्यकीय सेवेबरोबरच शिक्षण सेवा करून शिक्षणाविषयीचे त्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्राचार्य सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. कौशल्यपूर्ण व व्यावसायिक शिक्षणावर भर – प्राचार्या डॉ. अरूणा चौधरी शिक्षणक्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांच्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्यपूर्ण व्यवसायिक शिक्षणावर भर देण्यात येत आहे. जेणेकरून उद्याचा सक्षम व जबाबदार नागरिक तयार होऊ शकेल. त्यासाठी शिक्षकांनी देखील राष्ट्रनिर्मितीचे कार्य या दृष्टिकोनातून शिक्षकी पेशाकडे पाहावे. मूल्याधारित शिक्षण संस्कृती जोपासून आदर्श विद्यार्थी घडविणारे शिक्षक हा समाजातील अविभाज्य घटक असल्याचेही डॉ. अरूणा चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगतातून सांगितले.

56 भुसावळ (प्रतिनिधी )-शिक्षकदिनाचे औचित्य साधून येथील डॉ. मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२० ने गौरव …

रोटरी क्लब ऑफ भुसावळचे वार्षिक इन्स्पेक्शन संपन्न ;

भुसावळ –रोटरी क्लब ऑफ भुसावळचे वार्षिक इन्स्पेक्शन 3030 चे गव्हर्नर रोटेरियन शब्बीर शाकीर यांच्याद्वारे ऑनलाइन संपन्न झाले.दिनांक 5/10/20 रोजी रोटरी क्लब भुसावळ क्लब ची ऑनलाइन …

भुसावळातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणासाठी आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी – शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-उपविभागीय अधिकारी कार्यालय भुसावळभुसावळ शहरांमध्ये आय पी एस अधिकारी मिळावा किंवा जे अधिकारी नेमले आहे त्यांच्याकडून सक्तीची कारवाई करून घ्यावी म्हणून स्वाक्षरी मोहीम …

किन्ही येथे अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ तालुक्यातील कीन्ही येथे तालुका पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड घालून अड्डा उद्ध्वस्त करीत एकाविरुद्ध कारवाई केली .कीन्ही शिवारात नाल्या जवळ सार्वजनिक …

हावडा मुंबई व हावडा अहमदाबाद विशेष गाडी आता दररोज धावणार ;

भुसावळ ( प्रतिनिधी )-रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाश्यांच्या सुविधे साठी दोन गाड्यांच्या संचालन मध्ये वाढ करण्यात आली आहे. आधी याच दोन गाड्या त्रीसाप्ताहिक मध्ये चालवल्या जात होत्या, …

भुसावळात सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा रुजू ; शहरातील सर्व पोलिस स्टेशनला धावती भेट ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ पोलिस उप विभागाचे डीवायएसपी गजानन राठोड यांची नवी मुंबई येथे सहायक आयुक्त्तपदी बदली झाल्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली होती. त्यांच्या जागी …

शार्ट सर्किटने ओमनी व्हँनला आग ; प्रवासी सुखरूप ;महामार्गावरिल थरार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भुसावळहून जळगावकडे जाणाऱ्या ओमनी व्हॕनला शनिवारी रात्री 11.30 च्यासुमारास शार्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागल्याची घटना घडली . …

गांधी धाम एक्स्प्रेसच्या वेळेत झाला बदल –

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे प्रशासनाकडून काही विशेष गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यात अप ०२९७४ खुर्दा रोड ते गांधीधाम विशेष गाडी ३ ऑक्टोबरपासून बडनेरा येथे …

भुसावळ तालुका वकील संघातर्फे हाथरस प्रकरणाचा तीव्र निषेध ; पीडितेस वाहिली श्रद्धांजली ;

भुसावळ (प्रतिनिधी )-उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १४ सप्टेंबर रोजी घड़लेल्या माणूसकीला काळिमा फासणाऱ्या बलात्कार व हत्याकांडाचा भुसावळ तालुका वकील संघातर्फ आज शनिवार रोजी तीव्र निषेध …

स्वयंचलन अर्थात ऑटोमेशन ही उद्योगांसाठीची महत्वाची बाब-प्राचार्य डॉ.आर. पी. सिंह

भुसावळ (प्रतिनिधी )-स्वयंचलन अर्थात ऑटोमेशन ही उद्योगांसाठीची महत्वाची बाब म्हणून समोर येते आहे. शक्य होईल तेवढे माणसांचा वापर कमी करत निर्मिती आणि प्रक्रिया ह्या उद्योगण …

शिवपूर कन्हाळयातील अवैध हातभट्टी अड्डा नष्ट ; तालुका पोलीसांची धडक कारवाई ;

तालुक्यातील शिवपुर कन्हाळा येथे तालुका पोलिसांनी शुक्रवार रोजी गावठी हातभट्टी दारू अड्डयावर धडक कारवाई केली .या कारवाईमुळे हातभट्टीधारकां मध्ये खळबळ उडाली आहे .शिवपुर कन्हाळा शिवारात …

श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात एमएचटी-सीईटी ऑनलाइन परीक्षांना सुरुवात ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –महाराष्ट्र शासनाच्या अभियांत्रिकी औषधनिर्माण शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एमएचटी-सीईटी ऑनलाइन परीक्षांना गुरुवार पासून सुरुवात झाली. भुसावळ शहरात श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी …

स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंती निमित्ताने अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे किराणा वाटप ; भुसावळ बस स्थानक परिसरातील ५० गरीब आणि गरजू कुटुंबाना मदत.

भुसावळ (प्रतिनिधी )-माजी आमदार तथा खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांची ३ ऑक्टोबर रोजी असलेल्या जयंती निमित्ताने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळच्या वतीने भुसावळ बस स्थानक परिसरातील ५० गरीब …

स्व.हरीभाऊ जावळेंच्या जयंती निमित्ताने 3 रोजी ‘ आठवणीतले हरीभाऊ ‘ कार्यक्रमाचे आयोजन ; केंद्रीय मंत्री नितिन गडकरी , प्रकाश जावडेकर , संजय धोत्रे देणार आठवणींना उजाळा ;

यावल –माजी आमदार तथा खासदार कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे याची 3 ऑक्टोबर रोजी जयंती असल्याने आठवणीतले हरीभाऊ या व्हर्चुअल आणि ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील भालोद येथे …

व्यसनमुक्तीची वारी,आपल्या दारी-चेतना व्यसनमुक्ती केंद्राचा अभिनव उपक्रम –

जळगाव –व्यसन मानवी जीवन पोखरते. व्यसनामुळे संसार उध्वस्त होतात. त्यामुळे जळगावतून विदर्भात व्यसनविरोधात एल्गार करणाऱ्या रॅलीला विशेष महत्व आहे, असे प्रतिपादन आ.राजूमामा भोळे यांनी केले. …

भुसावळात गांधी जयंतीनिम्मित्त भाजपचे स्वच्छता अभियान ; खासदार खडसेंसह पदाधिकाऱ्यांनी केला परिसर स्वच्छ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-गांधी जयंतीनिम्मित्त गांधी पुतळा,जळगाव रोड,भुसावळ स्वच्छता येथे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे,खासदार श्रीमती.रक्षाताई खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे,प्रा.सुनील नेवे सर,माजी …

भुसावळात रस्त्यावर गोंधळ घालणार्‍या बारा टारगटां विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील जामनेर रोडवरील आयसीआयसीआय बँकेच्या जवळ असलेल्या एम.एच.फिटनेस जीमजवळ काही युवकांमध्ये वाद झाल्याने ते गोंधळ घालत असल्याने बारा जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला.शहरातील …

उत्तर प्रदेश सरकारच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमेटी,अनु.जाती विभागातर्फे निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-उत्तर प्रदेशातील हाथरस येथील झालेल्या अमानुष घटनेतील मयत मनिषा वाल्मिकी हिच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी भेटण्यास जात असतांना काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी …