फसवणूक प्रकरणातील वॉण्टेड आरोपीस गुन्हे शाखेने केले जेरबंद ;


जळगाव –

फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांना हव्या असलेल्या आरोपीच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. गौतम मनोहर लहाने (पांडव नगरी, राधाकृष्ण अपार्टमेंट) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी रामानंदनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला होता. संशयीत आरोपी गौतम लहाने नाशिक येथे घरी आला असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने नाशिक येथील इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने आरोपीला अटक करून अधिक कारवाईसाठी रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल इंगळे, अनिल देशमुख, कमलाकर बागुल, रमेश चौधरी, रावसाहेब पाटील आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *