साकेगाव येथे नवीन पाइपलाइनच्या कामास शुभारंभ गावात आजपासून दोन दिवस कोरडा दिवस व पाणी पुरवठा बंद राहणार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-

भुसावळ तालुक्यातील
गावात विरोधी पक्षाच्या लोकांनी दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत खोटी बातमी प्रसिद्ध केली असता ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन गावातील सर्व लिकेज व पाण्याची टाकी स्वच्छ करून दोन दिवस कोरडे दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे गावात आजपासून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे याची ग्रामस्थांनी नोंद घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केलेले आहे
दिनांक १९ व २० मे रोजी गावात कोरडा दिवस पाळण्यात येणार असून सर्व लिकेज व दुरुस्तीच्या कामाला दिनांक 18 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे गावातील चुडामण नगरातील पाईप लाईन लिकेज पाईप दुरुस्ती न करता त्या ठिकाणी नवीन पाईप लाईन कामास समाजसेवक कालु पाटेल
यांच्या हस्ते नारळ वाहून जेसीबी च्या माध्यमातून चारी खोद कामास सुरुवात करण्यात आली प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील प्रभारी सरपंच आनंद ठाकरे माजी सरपंच अनिल पाटील सुरेश पाटील सरपंच पती विष्णू सोनवणे ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल सपकाळे कुंदन कोळी सागर सोनवाल गजानन पवार समाधान कोळी पप्पू राजपूत सुभाष सोनवणे ग्राम विकास अधिकारी अशोक खैरनार आदींची उपस्थिती होती
त्याचबरोबर वार्ड क्रमांक पाच मधील व्हॉल दुरुस्ती, वार्ड क्रमांक एक मधील पाईप लाईन लिकेज असे विविध कामे ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत असून येत्या दोन दिवसात गावातील संपूर्ण लिकेज काढले जातील असे सरपंच ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे तसेच दिनांक 21 मे पासून गावात पाणीपुरवठा सुरू पूर्ववत करण्यात येईल याची ग्रामस्थांनी दखल घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *