भुसावळ ( प्रतिनिधी ) –
गीता परीवार दक्षिणांचल अखिल भारतीय माहेश्वरी महिला संगठन ची बाल व किशोरी विकास समिती विप्र फौंडेशन महिला प्रकोष्ठ तथा वन बंधू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 मे ते 30 मे पर्यंत मुलांसाठी सर्वांगिन विकास तसेच संस्कार ज्ञान महायज्ञ आरंभ करण्यात आला आहे .
दक्षिणांचल अखिल भारतीय महेश्वरी महिला संघटनेच्या प्रमुख कॉर्डिनेटर डॉक्टर सौ संगीता मनोज बियाणी यांनी माहिती दिली की , गीता परिवारद्वारा आयोजित ह्या कार्यक्रमात ४४ देशांमधील अडीच लाख मुलांनी सहभाग घेतला आहे हा उपक्रम 5 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांमुलीसाठी आहे. 1000 व्हाट्सअप ग्रुप ने ह्या सर्व सहभागी मुलांना लिंक पाठवली जाते, ह्या लिंक च्या माध्यमातून विद्यार्थी ह्या उपक्रमामध्ये सहभागी झाले लॉक डाऊन च्या ह्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ज्ञांवर्धक, मनोरंजनात्मक, योगासने प्रार्थना, महिषासुर मर्दिनी स्तोत्र,आर्ट,क्राफ्ट वर्क इत्यादी गोष्टी घर बसल्या मोबाईल च्या माध्यमातून शिकतील तसेच दररोज मुलांना एक प्रश्नोत्तरी दिली जाईल त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पारितोषिक तसेच प्रमाणपत्र सुद्धा दिले जाईल , हा कार्यक्रम खरोखरच एक अद्वितीय व अद्भुत असा कार्यक्रम
आहे, या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने मुलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन अखिल भारत दक्षिणांचल सह प्रभारी डॉक्टर सौ संगीता मनोज बियाणी यांनी केले आहे . तसेच या उपक्रमाच्या प्रचार प्रसार व यशस्वीतेसाठी दक्षिणांचल सहा प्रभारी डॉक्टर संगीता मनोज बियाणी भुसावळ तसेच दक्षिणांचल सहयोगी संगीता मनिया पुणे संतोष सोमानी कर्नाटक हेमा माहेश्वरी आंध्रप्रदेश सुमन कोठारी मुंबई प्रियंका मुंदडा तमिळनाडू यांचा सक्रिय सहभाग आहे . ह्या सर्वांना राष्ट्रीय प्रभारी निर्मला मारू तसेच दक्षिणांचलचे सर्व पदाधिकारीनी शुभेच्छा दिल्या आहे .



