जळगाव (प्रतिनिधी)- जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, जळगाव या महत्त्वपूर्ण पदावर शितल लेकुरवाळे-सावळे यांची पदोन्नतीने नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे विविध कर्मचारी संघटना तसेच महसूल, कोषागार, कृषी व पाटबंधारे विभागातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे मुख्य संघटन सचिव नुपम मेढे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ नाशिकचे विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे, कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटना जळगावचे जिल्हाध्यक्ष सुरेश वाडे, विभागीय उपाध्यक्ष दिनेश ठाकूर, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार पाटील, महिला उपाध्यक्षा ममता मेढे-बेहेरे, सदस्य राहुल बारी, जयदीप गाढे व अभिषेक पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच महसूल विभागाचे योगेश अडकमोल, महसूल जिल्हाध्यक्ष महेश सपकाळे, सुनील कराटे, संदीप खैरे, कोषागार विभागाचे रवींद्र गायकवाड, कृषी विभागाचे किशोर मराळे, पाटबंधारे विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन सपकाळे, सचिव भाऊजी हटकर, कार्याध्यक्ष विकी गोंधळी आणि गुरुनाथ शेंगदाणे यांनीही शितल लेकुरवाळे-सावळे यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जळगावचे अनेक पदाधिकारी व विविध विभागांतील कर्मचारी उपस्थित होते. पदोन्नतीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीस उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.



