भुसावळ येथे संघर्ष वाहन चालक संघटनेतर्फे ‘स्टेअरिंग छोडो’ आंदोलन! विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय महामार्गालगत वाहन चालक-मालकांचा सहभाग; राजू ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी) - वाहन चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भुसावळ येथे संघर्ष वाहन चालक संघटनेतर्फे राष्ट्रीय महामार्गालगत ‘स्टेअरिंग छोडो’ आंदोलन करण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जुनेद आणि सचिव अमजदभाई यांच्या आदेशानुसार, जळगाव जिल्हाध्यक्ष राजू ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

वाहन चालक आणि मालकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात परिसरातील अनेक चालक-मालकांनी सहभाग नोंदविला. आपल्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

या आंदोलनप्रसंगी जयंत जोशी, अनिल दाभोळकर, मनीष कुकरेजा, कैलास महाजन, बाळू तायडे, निवृत्ती तायडे, शांताराम कोळी, परशुराम वाघ, योगेश पाटील, रमेश सोनवणे, करीमभाई, जाबीरभाई, खगेन्द्र चौधरी, शाम कोळी, गणेश साळुंखे, राजू पाटील, सलीम पटेल, समीर पाटील, नेमिचंद ठाकूर, जुबेरभाई, भागवत पाटील, बंडू ठाकूर, बापू ठाकूर, बापू राजपूत, प्रशांत भोई, गोटू सोनार, गोपाळ बडगुजर, किरण जमदाडे, नाना सोनार, सिराजभाई, सुनील शिंदे, लखन चौधरी,का बबलू चौधरी, अशोक रोकडे, धनु महाजन, राजू ठाकरे, योगेश वाघ, संदीप वाघ, शाम माहुरकर, रमेश परदेशी आदी वाहन चालक व मालक उपस्थित होते.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहन चालकांच्या प्रश्नांसाठी संघटनेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनाची परिसरात चर्चा होती.