५० लाख रुपये न आणल्याने डॉक्टर विवाहितेचा छळ ; भुसावळातील पतीसह सात जणांविरोधात गुन्हा

भुसावळ ( प्रतिनिधी ) - राजस्थानच्या जयपूरमध्ये मोठे हॉस्पीटल बांधण्यासाठी माहेरुन 50 लाख रुपये न आणल्याने भुसावळातील उच्च शिक्षित डॉक्टर विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात डॉ.सौरभ प्रजापतसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉ.नयना सौरभ प्रजापत (32, हॉटेल सुहासजवळ, गोविंद कॉलनी, अयोध्या नगर, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 27 नोव्हेंबर 2023 ते दि. 4 जानेवारी दरम्यान पतीसह अन्य सात आरोपींनी राजस्थानच्या जयपूरमध्ये मोठे हॉस्पीटल बांधण्यासाठी माहेरून 50 लाख रुपये आणावेत म्हणून मानसिक व शारीरीक त्रास देत वेळोवेळी गांजपाठ करीत मारहाण केली व रक्कम आणल्याशिवाय नांदवण्यास घेणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपींमध्ये डॉ.सौरभ प्रजापत (31), सासरे प्रभूराम प्रजापत (62), सासू संतोष प्रभूराम प्रजापत (58), जेठ डॉ.नितीन प्रभूराम प्रजापत (33), चुलत सासरे रामजी प्रजापत (56), चुलत सासू कांचन प्रजापत (48, हॉटेल सुहासजवळ, गोविंद कॉलनी, भुसावळ), नणंद डॉ.स्वाती प्रजापत (36, उदयपूर, राजस्थान) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तेजस पारीस्कर करीत आहेत.