भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ विधानसभा मतदार संघात एआयआरमध्ये मतदारसंघातील १४,५६२ मतदारांविरुद्ध त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी फॉर्म- सातद्वारे १२ ऑक्टोंबर रोजी ऑफलाइन पद्धतीने केवळ १८६ जणांनी हरकती दाखल केल्या आहेत. एकाच दिवशी दाखल झालेल्या या हरकतीच्या प्रकरणी एफआयआर नोंदवून स्वतंत्र चौकशीची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे. भारत निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार स्पष्ट निर्देश दिलेत की, एक वैयक्तिक मतदार दावे व हरकतींच्या संपूर्ण कालावधीत जास्तीत जास्त १० फार्म सात चे अर्ज दाखल करू शकतो आणि ही मर्यादा ऑनलाइन व ऑफलाइन बनावट हरकत; नाव वगळू नका जळगाव जिल्ह्याबाहेरील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत या संपूर्ण प्रकाराची कालबद्ध चौकशी करण्यात यावी. हे अर्ज कोणी आणले, कोणत्या अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने स्वीकारले, त्यांची आवक नोंद व पोचपावत्या आहेत काय, आणि आयोगाची मर्यादा असताना ते का स्वीकारले गेले. मतदार यादीची शुद्धता व प्रत्येक पात्र नागरिकाचा मताधिकार हा लोकशाहीचा पाया आहे. एकाही पात्र मतदाराचे नाव बनावट हरकतीमुळे वगळले जाऊ नये, यासाठी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून निष्पक्षपणे कारवाई करा, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रात म्हटले आहे. दोन्ही पद्धतींना लागू आहे. सदर निर्देश निर्गमित झाल्यानंतर केवळ तीन दिवसांनी भुसावळात हरकर्तीचा हा प्रकार घडला. ज्यांच्या नावाने हे अर्ज दाखल झाले, त्यांच्यापैकी काही व्यक्तींनी स्वतःच ते अर्ज आपले नसल्याचे लेखी कळवले आहे. तीन व्यक्तींच्या नावाने मिळून ४६३ हरकती दाखल आहेत. अर्जदारांच्या नावाने प्रत्येक भागात नेमक्या २५ हरकतींचे एकसारखे गठे दाखल आहेत. मतदार यादीत आधीच नाव असलेल्या व्यक्तीचे नाव, त्यास नोटीस व म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्याशिवाय आणि ठोस पुराव्याशिवाय वगळता येत नाही. एकाच दिवशी, एकसारख्या गठ्यांमध्ये, १८६ नावांनी इतके अर्ज दाखल होणे हे संघटित नियोजनाशिवाय शक्य नाही; त्यामुळे यामागील सूत्रधारांचा शोध घेणे तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.



