‘त्या’ वाहक, चालकाचे निलंबन ; विद्यार्थिनींना भर रस्त्यात उतरवणे भोवले ;

भंडारा (वार्ताहर ) -भंडारा आगाराच्या भंडारा ते मुंढरी या बसच्या चालक वाहकाने गाडीत गंतव्य स्थळापर्यंत पुरेसे प्रवाशी नाहीत म्हणून बसमध्ये असलेल्या दोन विद्यार्थिनींना रात्रीच्या वेळी भर रस्त्यात उतरवण्याची प्रकार १४ नोव्हेंबर रोजी घडला होता. याची गंभीर दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबई यासाठी कारणीभूत चालक आणि वाहक अशा दोघांच्याही निलंबनाची घोषणा केला आहे. सोबतच चौकशीचे आदेशही देण्यात आले आहे.

१४ नोव्हेंबर २०२६ रोजी भंडारा आगाराच्या एम.एच.४० वाय ५००८ क्रमांकाची एसटी बस भंडारा ते मुंढरी
या आपल्या नियमित फेरीसाठी निघाली. बसमध्ये मुंढरी येथील दोन विद्यार्थिनी प्रवास करीत होत्या. गाडीत दोघींशीवाय इतर प्रवासी नसल्याचे पाहून चालक अनिल सावरे आणि वाहक उदेभान मेश्राम यांनी त्यांना कोका येथे निर्जनस्थळी उतरवत मुंढरी येथे आपल्या गंतव्यस्थळी न जाता, परत भंडाऱ्याला जाण्याचा प्रयत्न केला. याची दखल घेत एसटी प्रशासनाने तातडीने प्राथमिक चौकशी केली. भंडारा विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक यांच्यामार्फत चौकशी करून संबंधित चालक अनिल सावरे आणि वाहक उदेभान मेश्राम यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यानुसार दोघांनाही १६ नोव्हेंबरपासून एसटी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.