भुसावळ विभाग प्रबंधक एस एस केडीया यांनी पाचोरा ते जामनेर दरम्यान केली पाहणी :

भुसावळ विभागाचे मंडल रेल प्रबंधक एस एस केडीया यांनी भुसावळ ते पाचोरा टॉवर वागनने आणि पाचोरा ते जामनेर रोड निरिक्षण केले
पाचोरा न्यारो गेज चे प्लॅटफॉर्म , सी एन्ड डबल्यू सेक्शन आणि ट्रॅकचे निरिक्षण केले
वरखेडी, शेंदुर्णी, पहूर स्टेशन वर येऊन पाहणी केली नकाशा बघुन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या
पहुर स्टेशनच्या आधी वाघुर नदीवर असलेला ब्रिजचे निरिक्षण केले. हा ब्रिज फार जुना असुन तो 1918 साली बांधण्यात आलेला आहे.
जामनेर स्टेशन व आरक्षण केंद्राचे नाही निरिक्षण केले जामनेर स्टेशनवर नव्याने तयार होणाऱ्या रेल मुझियमच्या जागेची पाहणी केली यासाठी आवश्यक सूचना दिल्या.
निरीक्षण करते वेळी डॉ. शिवराज मानसपुरे वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक, वरिष्ठ मंडळ अभियंता समन्वय तरुण दंडोतिया, उपमुख्य अभियंता निर्माण श पंकज धावरे व इतर अधिकारी उपस्थीत होते .