भुसावळ- येथील भुसावळ कला,विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन दि.21 जानेवारी 2023 रोजी शनिवारी सकाळी 10.30 वा.महाविद्यालयातील वाचनकक्षात करण्यात आलेले आहे सदरहू मेळाव्याचे उद्घाटन महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी इंग्रजी विषयात गोल्ड मेडल मिळविलेली कु.शिबा खान हिच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी डॉ.मोहनभाऊ फालक तर प्रमुख पाहुणे ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि माजी विद्यार्थी महेशभाऊ फालक ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विष्णूभाऊ चौधरी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष आणि माजी विद्यार्थी संजयकुमारजी नाहाटा तसेच ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही.पाटील,उपप्राचार्य डॉ.बी.एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य आणि माजी विद्यार्थी डॉ.ए.डी.गोस्वामी,उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे क ब चौ उ म वि अधिसभा सदस्य आणि माजी विद्यार्थी प्रा.ई जी.नेहते माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील सचिव प्रा.डॉ.जी आर वाणी,मेळावा समन्वयक डॉ.आशिष चौधरी हे असतील सदर मेळाव्यात सन 2016 ते 2022 पर्यंत पदवी व पदव्युत्तर परीक्षा पास झालेले सुमारे 156 माजी विद्यार्थी सहभागी होतील असा अंदाज आहे.या सर्व माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.दिवसभरातील या मेळाव्यात पुढील महिन्यात येऊ घातलेल्या नॅक पीअर टीमचा माजी विद्यार्थ्यांशी जो संवाद होणार आहे या विषयावर, तसेच माजी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयाकडून आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून कोणत्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा कशा पूर्ण कराव्यात कोणकोणती पावले उचलली जावी या विषयावर साधकबाधक चर्चा केली जाणार आहेत तसेच माजी विद्यार्थ्यांचा ओळख परिचय हा एक स्तुत्य उपक्रम या मेळाव्यात घेण्यात येणार असून या मेळाव्यासाठी सन 2016 ते 2022 मध्ये पदवी व पदव्युत्तर परीक्षा पास झालेले माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेतर्फे कोषाध्यक्ष प्रा.हर्षल पाटील,प्रा.दीपक पाटील,प्रा.चंद्रकांत सरोदे प्रा.डॉ.गौरी पाटील यांनी केलेले आहे अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क- प्रा. स्मिता बेंडाळे मो.नं- 7588687960,प्रा.स्वाती शेळके मो.नं- 9970236557 यांच्याशी साधावा



