रोटरी क्लब व अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आदिवासी बांधवांची दिवाळी गोड!नागादेवी पाड्यातील १०० कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप; महिला, पुरुष व बालकांना नवीन कपडे आणि खाऊचे वितरण

भुसावळ (प्रतिनिधी) – दिवाळीचा सण म्हणजे आनंद, मांगल्य, प्रेम आणि आपुलकीची देवाणघेवाण. समाजातील वंचित घटकांच्या जीवनात आनंदाची ज्योत प्रज्वलित व्हावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रोटरी क्लब भुसावळ आणि श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी यावल तालुक्यातील सावखेडा येथील नागादेवी पाड्यावर आदिवासी बांधवांसाठी दिवाळी फराळ, नवीन कपडे आणि खाऊ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

सकाळी १०.३० वाजता आयोजित या उपक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष मदन बोरकर, सचिव गोपीनाथ अय्यर, श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा अलकाताई ढाके आणि सचिव गजानन शेवाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संघाचे मार्गदर्शक गजाननदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

यावेळी नागादेवी पाड्यातील महिला, पुरुष आणि लहान मुलांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच बालगोपाळांना बिस्किटे, गोळ्या, कुरकुरे आदी खाऊचे वाटप करण्यात आले. लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि निरागस हास्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, पाड्यातील जवळपास १०० कुटुंबांपर्यंत दिवाळीचा गोडवा पोहोचविण्यासाठी प्रत्येक घरात दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमाला स्थानिक आदिवासी बांधवांसह देवगिरी कल्याण आश्रमाचे मोलाचे सहकार्य लाभले. आश्रमाचे सदस्य नरसिंग बारेला, वीरसिंग बारेला आणि सौ. विजया निकम यांनी विशेष सहकार्य केले. तसेच उपक्रमाच्या यशस्वितेसाठी दिनकर बेंडाळे, प्रकाश ठाकूर, अशोक निकम आणि सौ. माधुरी कळसकर यांनी योगदान दिले. रोटरी क्लब भुसावळ आणि श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

दिवाळीच्या प्रकाशात केवळ स्वतःची घरेच नव्हे, तर इतरांच्याही जीवनात आनंदाचे दीप उजळावेत, या उदात्त भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने सामाजिक एकोपा, माणुसकी आणि सेवाभावाचा सुंदर आदर्श निर्माण केला. अशा उपक्रमांमुळे सणांचा खरा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतो,