भुसावळ रेल्वे स्थानकावर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची शिवसैनिकांनी घेतली भेट ;

भुसावळ – शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार प्रवासा दरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावर आले होते. यावेळी त्यांचे स्वागत शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, ऍड. निर्मल दायमा, युवा सेनेचे शहर युवाअधिकारी सुरज पाटील यांनी केले.
भुसावळ विषयी बोलतांना येणाऱ्या नगरपालिका निवडणूकीमध्ये प्रचार सभा घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. भुसावळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थीतीवर त्यांनी अर्धा तास कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्षे अविरत सुरू राहणार आहे, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अश्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी शिवसेना पादाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .