भुसावळ – येथील हिन्दी सेवा मंडळाला सात दशकांहूनही अधिकची गौरवशाली शैक्षणिक परंपरा लाभलेली आहे. ह्या परंपरेत श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह हे आपल्या 21 वर्षांच्या दिर्घ् सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. आपल्या सेवानिवृत्ती प्रसंगी प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह यांनी हिन्दी सेवा मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे कर्मचारी तसेच विद्यापीठ या सर्वांच्या सहकार्याबद्दल रुणनिर्देश व्यक्त करत प्राचार्य पदाची सूत्रे डॉ. राहुल बारजिभे यांच्याकडे सोपविली. प्राचार्य पदाची सूत्रे स्वीकारल्यावर डॉ. राहुल बारजिभे यांनी नवीन जबाबदारी बद्दल हिन्दी सेवा मंडल पदाधिकार्यां चे आभार मानले आणि श्री. संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाला अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पातळीवर पोहोचवण्यासाठी स्व.भैय्याजींनी (श्री. डी.डी.शर्मा यांनी) पाहिलेल्या ध्येयाकडे वाटचाल करतांना अभियांत्रिकी शिक्षणविषयीची निष्ठा व जबाबदारी ह्यांचे निस्वार्थपणे पालन करून महाविद्यालयाला नवीन उंचीवर नेण्यासाठी समर्पणाने झोकून देऊन मी आणि माझे सहकारी काम करतील असे सांगितले. डॉ. राहुल बारजिभे यांना 20 वर्षानहूनही अधिकचा प्रदीर्घ शैक्षणिक अनुभव आहे. गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जडणघडणीत सरांचा मोलाचा वाटा राहिलेला असून ते महाराष्ट्र राज्याचे तंत्र विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ , लोणेरे येथे एक्झिक्युटिव कौन्सिल, अॅकडमिक कौन्सिल, बोर्ड ऑफ एक्सामीनेशन चे सभासद तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे बोर्ड ऑफ स्टडीज चे सभासद अश्या अत्यंत महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. जळगांव येथे तंत्रशास्त्र विद्यापीठाचे विभागीय केंद्र स्थापन करण्यात सरांचा सिंहाचा वाटा होता. तंत्रशास्त्र विद्यापीठात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पारंपरिक विद्यापीठातील महाविद्यालय जोडताना विद्यापीठनिहाय विषयांचे वैविध्य लक्षात घेत त्यांचे तंत्रशास्त्र विद्यापीठात सामिलीकरण करतांना राज्य पातळीवर त्यांनी बजावलेली समन्वयकाची भूमिका कुलगुरू तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाकडून वाखाणली गेली. मेकॅनिकल इंजीनीरिंग मधील व्हायब्रेशन अँड अक्कोस्टिक्स हे त्यांच्या विशेष संशोधनाचे विषय असून आठ विद्यार्थ्यांचे पी.एच.डी. मार्गदर्शक म्हणून ते काम पाहत आहेत. सरांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र आणि तांत्रिक मासिकांमध्ये 46 शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

श्री संत गाडगेबाबांचे आशीर्वाद, हिन्दी सेवा मंडळाचे पाठबळ ,कर्मचार्यांवच्या सदिच्छा, शुभेच्छा आणि सहकार्य ह्या शिदोरीनिशी वाटचाल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव एम.डी.शर्मा, कोषाध्यक्ष एम.डी.तिवारी, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, रमेश नागराणी, डॉ. रविकान्त परदेशी, बिसेनजी अग्रवाल, संजय नाहटा, पंकज संड, संजय जोशी, तसेच इतर पदाधिकार्यांषनी शुभेच्छा दिल्या आहेत.


