भुसावळ – महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांचे भुसावळ येथे जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाच्या वतीने ढोलताशांच्या गजरात फटाके फोडून व औंक्षण करून जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार शिरीषदादा चौधरी, माजी खासदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. उल्हासदादा पाटील,जळगांव जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा पवार, जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोजकुमार सोनवणे,जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे,भुसावळ काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनिल जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार, प्रकाश मोरे सर, सौ. नंदाताई बावटे,सुरेश टाक,सागर कुरेशी व काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



