साकेगाव येथे कोरोना योद्धा कामगारांचा सत्कार व चोवीस हजाराचे बक्षीस वाटप ;

  • आमदार संजयभाऊ सावकारे यांनी दिले 11000 रोख
  • गाव पूर्णपणे कोरोना मुक्त
    भुसावळ (प्रतिनिधी )-
  • तालुक्यातील साकेगाव येथ कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायत कर्मचारी कोरोना योद्धांचा सत्कार व ग्रामपंचायत तर्फे अकरा हजार रुपये आमदार संजय सावकारे यांच्यातर्फे अकरा हजार रुपये व सरपंच आनंद ठाकरे यांच्यातर्फे दोन हजार असे एकूण 24 हजाराचे बक्षीस आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाला देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले याबद्दल ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाने आनंद व्यक्त केला आहे
    दिनांक एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अकरा हजार रुपयांचे रोख बक्षीस घोषित केले होते त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून कर्मचारी वर्गाच्या मुलाखती घेण्यात आलेल्या होत्या
    सर्व कर्मचारी वर्गाने उत्कृष्ट कार्य केल्यामुळे सर्वांना एकत्र अकरा हजार रुपयाचे बक्षीस घोषित करण्यात आले होते बक्षीस प्रदान करताना मा. आमदार संजय भाऊ सावकारे यांनी कर्मचारी 24 व बक्षीस अकरा हजाराचे असे बोलून माझ्या खिशात जितके पैसे असतील तितकी देणगी मात्र त्यांच्या खिशात अकरा हजार रुपये निघाले एकूण बावीस हजार झाले सरपंच आनंद ठाकरे यांच्यातर्फे दोन हजार रुपये जमा करीत एकूण चोवीस हजार रुपये पूर्ण केले प्रसंगी सर्व कर्मचारी वर्गाला 24 हजार रुपयाचे बक्षीस व एक गिफ्ट ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते प्रत्येकी प्रदान करण्यात आले यावेळी आमदार संजय भाऊ सावकारे यांनी गाव पूर्णपणे पूर्ण मुक्त झाल्याबद्दल सर्व कर्मचारी वर्गाचे व ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले व कामगार दिनाच्या तसेच महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रसंगी सरपंच आनंद ठाकरे माजी सरपंच अनिल पाटील संजय पाटील माणिक पाटील सुभाष कोळी डॉक्टर बाबासाहेब पाटील सरपंच पती विष्णू सोनवणे ग्रामपंचायत सदस्य सचिन सपकाळे कुंदन कोळी गजानन पवार हिम्मत सोनवणे अरुण कोळी सचिन राजपूत सागर सोनवाल अजय चौधरी संतोष पाटील विलास ठोके ग्राम विकास अधिकारी अशोक खैरनार सह सर्व कर्मचारी बांधव व मान्यवरांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *