भुसावळ (प्रतिनिधी )-
तळवेल ते आचेगाव व तळवेल ते नागेश्वर मंदिर वरणगाव रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून या रस्त्यावरिल वाढलेल्या झाडाझुंड़पामुळे अनेक अपघात होत आहे . याबाबत नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या मात्र याबाबीकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे .याबद्दल शिवसेनेचे तालुका प्रमुख यांचेकडे तक्रार केली असता त्यांनी याची दखल घेवून या रस्त्याची पाहणी केली .
याबाबत सविस्तर वृत्त असे की तळवेल येथून आचेगाव येथे व तळवेल येथून नागेश्वर मंदिर मार्गे वरणगाव येण्या-जाण्यासाठी जो रस्ता आहे त्यात आचेगावकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्यात जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तसेच रस्त्यावरील खडी उखडून रस्ता अतिशय खराब झालेला आहे रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठमोठी काटेरी झाडे झुडपे वाढली असून येणाऱ्या-जाणाऱ्या शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच तळवेल येथून वरणगाव कडे नागेश्वर मार्गे येणाऱ्या रस्त्यावर देखील रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे-झुडपे खूप मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्याचा देखील त्रास शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना होत आहे. रस्त्याने शेतकरी बैलगाड्या घेऊन जात असतात त्यावेळेस बैलांच्या डोळ्यांना शेतकऱ्यांना इजा झाल्याचे लक्षात आले आहे तसेच दुचाकी वाहनधारक व चार चाकी वाहन धारकांना देखील या काटेरी झाडा-झुडुपात मुळे खूप त्रास होत आहे ग्रामपंचायत द्वारा ग्रामसभेचा ठराव करून संबंधित प्रशासनाला म्हणजे जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना ठरावाचे निवेदन देऊनही संबंधित प्रशासनातील अधिकारी मुद्दाम जाणून बुजून डोळेझाक करून संबंधित रस्त्यावरील झाडेझुडपे न काढता परिसरातील शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या जीवाशी खेळत आहेत याबाबतची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यां मार्फत शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांना दिली असता त्यांनी तळवेल चे उपसरपंच उल्हास भारसके तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य एडव्होकेट मनोहर खैरनार शिवसेना उपतालुका संघटक प्रकाश कोळी युवा सेना उपतालुका युवा अधिकारी रमेश धरणे यांचेसह संबंधित रस्त्यांची पाहणी केली असता रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आढळून आली व दोन्ही बाजूला दुतर्फा काटेरी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आढळून आले संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले अजून या अधिकाऱ्यांना हे पूर्णपणे माहीत नाही की हा रस्ता आपल्या अखत्यारीत येतो किंवा नाही त्यासाठी त्यांना त्याबाबतीत सुचित करण्यात आले व त्वरित याचा शोध घेऊन सदरचा रस्त्यावरील काटेरी जाळ्या जुळते त्वरित काढण्यात यावी व रस्ता दुरुस्त करण्यात येऊन ग्रामस्थांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यावेळी शिवसेना शंकर पाटील , संदीप पाटील ,संजय कापसे , भास्कर कोळी ,दिलीप महाले , यांच्यासह वरणगावचे शिवसैनिक निलेश काळे उपस्थित होते .



