भुसावळात महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे होणार लोकार्पण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील ग्रामीण रुग्णालयात कार्यान्वित झालेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाचे शनिवार, 1 मे रोजी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होत आहे. प्रतिदिन 15 एमएमक्यबू क्षमतेच्या या प्रकल्पासाठी आमदार संजय सावकारे यांनी 32 लाख रुपये निधी दिला असून भुसावळसाठी मोठी उपलब्धी असलेल्या या प्रकल्पाचे आज शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे . यावेळी आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक धीवरे आदींची उपस्थित राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *