पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला ;

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री आलोक कंसल यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे.
श्री संजीव मित्तल, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांची रेल्वे बोर्ड सदस्य, पायाभूत सुविधा ( Member Infrastructure) म्हणून नवी दिल्ली येथे पदोन्नती झाली आहे.

श्री आलोक कंसल हे भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवा (आयआरएसई) च्या १९८३ च्या तुकडीचे वरिष्ठ अधिकारी असून दि. १४.१.२०२० पासून पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. श्री आलोक कंसल यांनी रुड़की विद्यापीठातून सुवर्ण पदकासह सिव्हिल अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी त्याच संस्थेतून सुवर्ण पदकासह स्ट्रक्चरल अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर पदवी देखील प्राप्त केली आहे.

त्यांना अतिवेगवान आणि आत्यंतिक घनता असलेल्या वाहतुकीच्या मार्गांच्या परिचालन आणि देखभालीचे १८ वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. श्री आलोक कंसल हे भारतीय रेल्वेच्या अति- वेगवान असलेल्या पहिल्या शताब्दी एक्स्प्रेस ट्रेनच्या सुरूवात करण्याशी संबंध असलेले पहिले सहाय्यक अभियांत्रिकी अधिकारी आहेत.

भारतीय रेल्वेतील सर्वात मोठा विभागीय रेल्वे असलेल्या दिल्ली विभागातील अभियांत्रिकी शाखेचे ते प्रमुख होते आणि त्यांनी बिलासपूर व उत्तर झोनमध्ये मुख्य ट्रॅक अभियंता म्हणूनही काम केले आहे. उत्तर रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वेच्या राजधानी मार्गांवरील पहिले वाहन युडीएफडीस अंतिम स्वरूप देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. निर्माण अभियंता म्हणून कार्यरत असताना श्री कंसल यांनी सुवर्ण चतुर्भुज आणि पूर्व-मध्य रेल्वे (ईसीआर) वर गेज रूपांतरण, दुहेरी प्रकल्पांचे अनेक प्रकल्प राबविले आहेत. मुंबईतील ठाणे- खाडी पुलावरील सर्वात लांब (२ कि.मी.) पीएससी बॉक्स गर्डर ( ५४.५ मीटर स्पॅन) त्यांच्याद्वारे कार्यान्वित करण्यात आला. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी रेल्वे बोर्डात प्रधान कार्यकारी संचालक / सिव्हिल इंजिनीअरिंग (नियोजन) म्हणून काम पाहिले आहे.

त्यांनी पार पाडलेल्या विविध जबाबदा-यांपैकी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून केलेले काम आहे. बिलासपूर झोनच्या मालवाहतुकीचे जटील केंद्रबिंदू असलेले अत्यंत महत्त्वपूर्ण ऑपरेशनल इंटरचेंज पॉईंट या विभागात हाताळले जातात. रेल्वे बोर्ड मध्ये असताना मानव संचलित (manned) रेल्वे फाटकांचे उच्चाटन, जीर्ण झालेल्या पुलांचे पुनर्वसन करणे ज्याची प्रगती त्या कालावधीत तिप्पटीने झाली यासारख्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सर्व विषयांचा समावेश असलेली नीति बनविण्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

श्री कंसल यांनी भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेमधील ३६ वर्षांच्या समृद्ध अनुभवातून त्यांनी संरचित आणि शिस्तबद्ध दृष्टिकोनातून आपल्या वाटचालीतील प्रकल्प पूर्ण केले आहेत.

श्री कंसल यांनी “ए-झेड फॉर क्वालिटी कंट्रोल एंड इन्स्पेक्शन ऑफ कॉंक्रीट स्लीपर्स” आणि “लर्निंग द फर्स्ट स्टेप बाय ए रेलवे इंजिनिअर” ही दोन पुस्तकेही लिहिली आहेत, जी भारतीय रेल्वेच्या सर्व क्षेत्रातील सहाय्यक विभागीय अभियंत्यांसाठी प्रात्यक्षिक मार्गदर्शक आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *