भुसावळात लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी ;


भुसावळ (प्रतिनिधि )-
शहरामध्ये शुक्रवार रोजी सकाळ पासून लसीकरण केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली .
ज्या नागरिकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि ज्यांनी केलेलं नाही अश्याही लोकांनी गर्दी केलेली होती .
परंतू लसीकरण केंद्रांवर तुरळक साठा उपलब्ध झाला असल्याने लस संपेल या भीतीने सुद्धा नागरिक गर्दी करत असल्याचे दिसुन आले .
प्रशासनाने पुरेसा साठा उपलबद्ध करावा अशी मागणी भुसावळकर नागरिकांनीं यावेळी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *