भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातुन दिनांक 30 एप्रिल रोजी 54 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले, सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वे द्वारा वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोरोना च्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचार्यांचा यथोचित सन्मान वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमा द्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधि म्हणुन बुरहानपुर,खंडवा, चालीसगाव, भुसावळ,जलगाँव, बडनेरा, नाशिक, इ. ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोंल्डर दिलेत. तसेच ऑनलाईन द्वारे त्यांच्या खात्यामध्ये 14.33 करोड रुपयाची राशी तत्काळ वर्ग करण्यात आली
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे यांनी केले.
सेवानिवृत्ती बद्दल कर्मचार्यांना अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी सेवानिवृत्ती बद्दल संबोधित करुन पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे धन्यवाद सहाय्यक कार्मिक अधिकारी श्री बी एस रामटेके यांनी केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील कर्मचारी तसेच सर्व कल्याण निरीक्षक आदिंनी परिश्रम घेतले.



