साई सेवा समिती ग्रुपतर्फे ट्रामा केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी विविध साहित्य भेट


भुसावळ (प्रतिनिधी )–
भुसावळ येथील साई सेवा समिती ग्रुपतर्फे ट्रामा केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी विविध साहित्य शुक्रवारी भेट देण्यात आले. त्यात इंजेक्शन, रक्तदाब मोजण्यासाठी डिजिटल मशीन, रक्तातील साखर मोजण्यासाठी ग्लुकोमीटर, ताप मोजण्यासाठी डिजिटल थर्मोमीटर, हँड ग्लोज, ऑक्सिजन मास्क आदी साहित्याचा समावेश आहे. यासाठी नगरसेवक निर्मल कोठारी, गव्हर्नमेंट काँट्रॅक्टर योगेश पाटील, माजी नगरसेवक बापू महाजन, सुरेश अग्रवाल, गणेश बेहरा आदींनीही सहकार्य केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *