दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा:-शिशिर जावळे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचे कडे केली मागणी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना ने संपूर्ण जगासह महाराष्ट्रला आपल्या विळख्यात अडकवलं आहे. या विषाणू च्या संक्रमणामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे मृत्यू दर वाढत आहे. या कोरूना च्या विषाणूच्या भयंकर संक्रमणामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे.रोजगार बुडालेत.गोर गरीब सर्व लोकांना आर्थिक टंचाई चा सामना करावा लागत आहेत. कुटुंबाच पालन पोषण करण हि जड झालेलं आहे. अशातच पालकांना विदयार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क सुद्धा भरणे डोईजड झाले आहे. एकीकडे शैक्षणिक संस्था सक्तीने विद्यार्थ्यांना त्यांनी न मिळालेल्या शैक्षणिक सुविधाचें सुद्धा शुल्क वसुलीची सक्ती करीत आहेत. बऱ्याच परीक्षा पुढे ढकलल्यात. 2 वेळा येता दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यातच दहावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याची विद्यार्थ्यांची पालकांची मागणी सुद्धा महाराष्ट्र सरकारने नाकारली. आणि मग महाराष्ट्र सरकारने 10 विच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. यंदा दहावीच्या परीक्षेला एकूण 16 लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. .कोरोना च्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पालकांनी आर्थिक स्थिती मजबूत नसतानाही इकडन तिकडन पैसे गोळा करून त्यांच्या पाल्याचें दहावी बोर्डाच्या परीक्षांचे प्रति विद्यार्थी 600 रुपये शुल्क भरलेत. अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्यात.महाराष्ट्र राज्य सरकारने परीक्षा रद्द केल्या आणि निकाल लावून झाला आहे. त्यांनी भरलेल्या शुल्कापोटी त्यांना शालांत परीक्षा देता आली नाही, परीक्षा शुल्काची एकूण रक्कम रुपये 96,60,00,000/ शासनाकडे जमा आहे.मग अशा या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षाच दिली नाही. मग शासनाकडे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कातून जमा झालेल्या रकमेतून शासन काय करणार आहे? म्हणून सदर परीक्षा शुल्क संबंधित प्रत्येक परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये परत करावे.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी केली आहे.

    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *