लग्न समारंभाच्या अक्षदा पडण्यापूर्वी प्रशासनांची कारवाई ; 20 हजाराचा दंड वसूल ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील जामनेर रोडवरील वाल्मिक नगर भागात गुरुवार रोजी लग्न समारंभाचा सोहळा सुरू असतांना
अचानक पोलीस व नगरपरिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या लग्न समारंभात शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने अक्षदा पडण्यापूर्वी प्रशासनांने दंडात्मक कारवाई केली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सुरु असलेल्या लॉकडाउन मध्ये कडक निर्बंध व संचारबंदी सुरु आहे . यात लग्न समारंभाना २५ जणांची प्रशासनाने परवानगी दिली आहे.
तरीही जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेशांना झुगारल्याने
शहरातील वाल्मिक नगर भागातील रहिवाशी गोपाळ ढोलपुरे यांचेसह एकास २० हजार रूपयांचा फटका बसला .
गोपाळ ढोलपुरे यांच्या राहत्या घरी लग्न समारंभ सोहळा सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळल्यावरून नगरपालिका पथक सोबत घेऊन घटनास्थळी पाहणी करण्याकरिता गेले असता लग्न समारंभा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव (वर्हाडी ) उपस्थित असल्याने प्रशासनाने दिनांक २९ रोजी २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तर लग्नात
वरातीची परवानगी नसतांना मोहन चंदेले बग्गीवाले आल्याने यांना देखील प्रशासनाने ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या लग्न समारंभासाठी आलेला डीजे पथक मात्र सर्व गडबड बघून डीजे घेऊन परस्पर पोबारा झाले .
आठवडे बाजारातही केली कारवाई ;
उपविभावीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या उपस्थितीत विना मास्क फिरणारे नागरिक तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारां विरुद्ध कारवाई करण्यात आली . यामध्ये विना मास्क फिरणाऱ्या २५ जणांकडून ५,७०० रुपये तर ७ दुकानदारांकडून १० हजार ५०० रुपये असे दिवस भरातून चार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण ३७ हजार २०० रुपये आठवडे बाजार व लग्न समारंभाकडून वसूल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *