भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक गुप्ता यांना कोरोनाची लागण ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे मुख्य प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनी मंगळवार रोजी डाॅक्टरांच्या सल्लानुसार कोविड-१९ टेस्ट केली असता डीआरएम गुप्ता यांचे अहवाल पॉझीटिव्ह आले असून गुप्ता यांची प्रकृती ठीक आहे त्यांना विलिगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून घरीच उपचार सुरु आहेत.
मागील महिन्यात डीआरएम कार्यालयातील विविध विभागातील कार्यालयात सुमारे 200 ते 250 अधिकारी व कर्मचारी यांची कोरोना तपासणी केली असता ते बाधीत आढळले आहेत यापैकी अनेक अधिकारी यांनी विलगीकरणात (घरी ) राहून उपचार घेतले तर अनेकांनी रेल्वे रुग्णालयात उपचार घेतले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *